शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात आरोपींना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:13 IST

तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाण्यासह हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बंदुकीच्या धाकावर पळविला होता मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाण्यासह हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सदर दोन्ही आरोपींनी संगणमत करून येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या जुन्या मार्गावर दुचाकीने जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील रोख, मोबाईल व सोन्याची अंगठी बंदुकीच्या धाकावर पळवून नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह एक बंदुक व दोन गोळ्या तसेच दोन मोबाईल जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना केळापूर शिवारातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गजानननगर येथील सुधीर अजाब कोवार व त्यांचा भाचा दुचाकीने इतवारा भागातील जुन्या सेवाग्राम स्टेशन रोडने जात असता दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी त्यांना वाटेत अडविले. बंदुकीच धाकावर त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, दोन मोबाईलसह ४०० रुपये हिस्कावून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता या दोन्ही कुख्यात गुन्हेगारांची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे ओळख लपवून वर्धा शहरात राहणाºया आरोपी राकेश पांडे व इमरान शेख जमीर याला केळापूर शिवारातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, अशोक साबळे, प्रदीप देशमुख, निरंजन वरभे, दिनेश कांबळे, राजेंद्र ठाकुर, संजय ठोमरे, रितेश शर्मा, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, रामकृष्ण इंगळे, विकास अवचट, विलास लोहकरे, भुषण पुरी, आत्माराम भोयर, संघसेन कांबळे, दिनेश बोधनकर, कुलदीप टांकसाळे, गणेश येवले यांनी केली.ओळख बदलवून राहात होता वर्धेतअटकेत असलेल्या आरोपी राकेश पांडे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०७, ३०२, ३९४, ३९२ या कलमांसह दारूविक्री व तस्करी प्रकरणी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगण्या प्रकरणी वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर इमरान शेख जमीर याच्याविरुद्ध मारहाण करणे, ३९२,३९४, ३२४ या कलमांसह दारूविक्री व तस्करी प्रकरणी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगण्या प्रकरणी वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर राकेश पांडे याच्याविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी तडीपारीची कारवाई केली होती. हे दोन्ही आरोपी आपली ओळख लपवून वर्धा शहरात राहत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस