लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेत प्रशासक राज असून काही विभागाचा अनागोंदी कारभार असल्याची सातत्याने ओरड होत आहे. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सोमवारी वर्ध्यातील दोन औषधी भांडाराला भेट देवून कुलूप लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या औषधी भांडारात नेमकं आहे तरी काय? याबद्दल मिनीमंत्रालयातही चर्चेला चांगलेच उधान आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्ध्यातील जाजूवाडी परिसरात जिल्हास्तरीय लस भांडार तर पोस्ट ऑफीस चौकालगत जिल्हास्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनात उडाली खळबळ, चर्चेला उधाणया दोन्ही ठिकाणाहून जिल्ह्यातील आरोग्य विभागाला औषधांचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान यांनी सोमवारी या दोन्ही औषधी भांडारांना भेट दिली. इतकेच नाही तर त्या दोन्ही भांडारांना कुलूप लावून ते पुढील आदेशापर्यंत न उघडण्याच्या सूचना केल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली. सीईओ साहेबांनी अचानक हा निर्णय घेतल्याने आरोग्यच नाही तर मिनी मंत्रालयातील यंत्रणेतही खळबळ उडाली. मंगळवारीही येथे तपासणी करण्यात आल्याने औषधी भांडार चांगलेच चर्चेत आले. पण, ही नियमित तपासणी असल्याचे सांगण्यात आले.
ही नियमित तपासणीच..."औषधी भांडाराची दर सहा महिन्यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच दोन्ही औषधी भांडाराला भेट दिली. तेथील औषधीसाठा, त्यांची ऑनलाइन नोंद, साठा बुकारवरील नोंद, रुग्णालयाला औषधी पुरविल्यासंदर्भात नोंद तसेच खरेदीबाबतही तपासणी करण्यात आली. याशिवाय मुदतबाह्य औषधी आहेत काय, याचीही पाहणी केली असून नोंदणीमध्ये दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यासंदर्भात सूचना केल्या जाईल."- जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.