शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केंद्राचे कायदे साठेबाज, नफेखोरांच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 15:55 IST

Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात : सेवाग्राम येथे काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह

सेवाग्राम (वर्धा) - केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे केलेले आहेत. या कायद्याविरुद्ध आम्ही सत्याग्रह करीत आहोत. महात्मा गांधींनी न्याय मागण्यांसाठी सत्याचा मार्ग दाखविला. त्याच मार्गाने आमची वाटचाल सुरू आहे. केंद्राने  केलेले कायदे हे साठेबाज आणि नफेखोराच्या बाजूचे आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सेवाग्राम आश्रमात शनिवारी सकाळी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल, भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेसने या सत्याग्रहाचे आयोजन येथे केले होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी आश्रम परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी लावलेल्या वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आश्रमासमोर सत्याग्रह आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आशीष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विजय औताळे, काँग्रेसचे समन्वयक मुजफ्फर हुसैन, प्रदेश प्रतिनिधी रवींद्र दरेकर, जिया पटेल, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, शेखर शेंडे, माजी मंत्री अनिस अहेमद, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल राऊत, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदी उपस्थित होते.

आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी काँग्रेस नेत्यांचे आश्रमात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नव्या कृषी कायद्यामुळे शेतकºयांच्या शोषणाचे काम होणार असून कै. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेली बाजार समितीची व्यवस्थाही हद्दपार केली जाणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी विकलेल्या शेतमालाच्या पैशाची हमी कोण घेणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाहेरचे व्यापारी येऊन शेतमाल खरेदी करतील, साठेबाजी करतील. जनतेला महागड्या वस्तू विकत घ्याव्या लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ह्यवैष्णव जन तोह्ण भजन व वैदिक प्रार्थना तसेच सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व हर देश मेंह्ण तू या भजनाने प्रार्थनेची सांगता झाली. त्यानंतर सत्याग्रहस्थळी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्याग्रहाच्या शामियानात केवळ ४० लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. सत्याग्रह सुरू असलेल्या ठिकाणी केवळ तीन महिलांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. ह्यरघुपती राघव राजा रामह्ण हे भजन आणि राष्ट्रवंदनेने काँग्रेसच्या या सत्याग्रहाची सांगता झाली.

महाविकास आघाडी सरकार या कायद्याचा विरोध करणारकेंद्र सरकारने लागू केलेल्या या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विरोध करणार असून लवकरच मंत्रिमंडळाची उपसमिती यासाठी बैठक घेणार आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.मराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाकामराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाकाव्यात कारण इतर समाजात असंतोष वाढणार नाही आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळेल. ओबीसींचे आरक्षण आहे. परंतू लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून दिले पाहिजे. ओबीसींमध्ये असंतोष आहे. आम्ही किती दिवस थांबायच हा प्रश्न ते करताआहेत अशी भूमिका राज्याच्या मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्याग्रह स्थळी माध्यमांशी बोलतांना मांडली. केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यासाठी राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. या कायद्यामुळे देशातील शेतकरी उद्धस्त होणार आहे. असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस