लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून पुलगावचे ठाणेदार रविंद्र गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेंद्र बुराडे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व गावातील दुर्गाउत्सव समित्या मधील कार्यकर्ते उपस्थित होते.नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा. तसेच काही अनुसूचित प्रकार करू नका तसेच निवडणूक असल्याने आचारसंहीतेचे उल्लंघन करू नका व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजऊ नका. जेणे करुन दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करावा, काही अडचण असल्यास पुलगाव पोलीस ठाण्यास कळवावे, असे यावेळी ठाणेदार रविंद्र गायकवाड यांनी दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.यावेळी सरपंच यांनीही मार्गदर्शन केले. गावातील दुर्गाउत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिकही उपस्थित होते.
नवरात्रीत शांतता राखून भक्तिभावाने उत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST
नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा. तसेच काही अनुसूचित प्रकार करू नका तसेच निवडणूक असल्याने आचारसंहीतेचे उल्लंघन करू नका व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजऊ नका. जेणे करुन दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
नवरात्रीत शांतता राखून भक्तिभावाने उत्सव साजरा करा
ठळक मुद्देरवींद्र गायकवाड : शांतता समितीची सभा