शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रातून पळविली रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:25 IST

रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देमुख्य मार्गावरील घटना : शहर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिलीप पुरुषोत्तम जाजोदीया यांच्या मालकीचे मुख्य मार्गावर शहर पोलीस ठाण्यासमोर कृषी केंद्र आहे. बुधवारी ते व त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे रात्री व्यावसायिक प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. दरम्यान रात्री उशीरा अज्ञात चोरट्याने त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून रोख ३८ हजार रुपये चोरून नेले. गुरूवारी सकाळी ८ वाजता जाजोदीया हे नेहमीप्रमाणे व्यावसायिक प्रतिष्ठान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर ठाण्यातील सुधाकर पचारे व संदीप चौरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दिलीप जाजोदीया यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणेमुख्य मार्गावरील ज्या कृषी केंद्रात चोरी झाली त्या कृषी केंद्रापासून शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस ठाण्यापासूनच हाकेच्या अंतरापर्यंतच्या परिसरात चोरी झाल्याने शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत घटना स्थळी उलट-सुटल चर्चा होत होती. शिवाय नागरिकांकडून आश्चर्यही व्यक्त केले जात होते. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.रोखसह मोबाईल लंपासहिंगणघाट : येथील शास्त्री वॉर्डातील मोहन रामदास हजारे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख २० हजार रुपयांसह एक मोबाईल लंपास केला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. हजारे कुटुंबिय घरी झोपून असताना अज्ञात चोरट्याने स्वयंपाक घरातील खिडकीतून प्रवेश करून घरातून एकूण २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.सोन्याचे दागिने पळविलेअज्ञात चोरट्यांनी वर्धा शहरातील रामनगर तुकाराम वॉर्ड भागातील निलेश शास्त्रकार यांच्या घरातून रोखसह सोन्याचे दागिने असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.चोरट्यांनी शास्त्रकार यांच्या घरातून रोख २ हजार ५०० रुपये, २ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, ४ ग्रॅमचे सोन्याचे डारले असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाईनगर येथील मांडवकर यांच्या घरातूनही ऐवज लांबविला. शिवाय एका घरी चोरीचा प्रयत्न केल्याची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस