वडिलाची तक्रार : नागपुरातील युवतीवर आरोप वर्धा : शहरातील शारदा लॉज येथे एका युवकाने आत्महत्या केली होती. ही आत्महत्या त्याने नागपूर येथील मुलीच्या त्रासापोटी केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांत केली. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील युवतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, २५ मे रोजी शहरातील शारदा लॉज येथे भूषण प्रकाश गिड (२९) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नागपूर येथील एका युवतीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मृतकाचे वडील प्रकाश माधव गिड रा. बांगरनगर, वाघापूर रोड, यवतमाळ यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोप असलेल्या युवतीविरूद्ध शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(शहर प्रतिनिधी)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: June 5, 2016 01:53 IST