लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई करून एका मालवाहूसह ७०० किलो जनावरांचे मांस जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.शहरातील इतवारा बाजार परिसरातील भंगारच्या दुकानातून अवैध कत्तल करून पाळीव प्राण्यांचे मास घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतवारा परिसर गाठून डब्ल्यू. बी. ११ सी. ४७८६ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस आढळून आले. पोलिसांनी ईकबाल नजीर कुरेशी वय ५५ वर्ष ,शाहरुख ईकबाल कुरेशी वय २५ व फारुख ईकबाल कुरेशी वय २४ वर्ष सर्व रा कुरेशी मोहल्ला पुलफैल वर्धा या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सदर ट्रक व सुमारे ७० हजार रुपये किंमतीचे मांस जप्त केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सचिन दवाळे, सचिन सोनटक्के आदींनी केली.पुलफैल भागात होते जनावरांची कत्तलवर्धा शहरातील पुलफैल भागात जनावरांची अवैध कत्तल करून मांस विक्री केली जाते. गो-मांस विक्रीवर बंदी असताना हा अवैध धंदा येथे सुरू असून त्यावरही कारवाई करण्याची मागणी पशुप्रेमींकडून करण्यात आली आहे.
७०० किलो जनावरांच्या मांसासह मालवाहू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST
शहरातील इतवारा बाजार परिसरातील भंगारच्या दुकानातून अवैध कत्तल करून पाळीव प्राण्यांचे मास घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतवारा परिसर गाठून डब्ल्यू. बी. ११ सी. ४७८६ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस आढळून आले.
७०० किलो जनावरांच्या मांसासह मालवाहू जप्त
ठळक मुद्देतिघांना अटक : शहर पोलिसांची धडक कारवाई, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले