शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:10 IST

Vardha : विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात. पण, कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात गोंधळ निर्माण होतो, पालकही संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडायची, कोणते करिअर योग्य आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे.

या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती आणि प्रवेश परीक्षेची ही माहिती मिळणार आहे. समुपदेशकाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, हे कळणार आहे. पालकांनाही याचा लाभ होणार आहे.

शिक्षकांची नवी भूमिकाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना ही प्रशिक्षण दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य ही शिक्षकांना करावे लागणार आहे.

करिअर गाइडची आवश्यकतादहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. विद्यार्थी, पालक चिंतेत सापडतात. यासाठी पालक कोणाला तरी विचारून मुलांचे करिअर ठरवतात. मात्र, यामुळे मुलाचे करिअर घडत नाही. यासाठी करिअर गाइडची आवश्यकता आहे.

नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदेकरिअर जागरूकता कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय याची माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअर निवडण्यात, योग्य दिशा मिळवण्यात आणि भविष्यासाठी तयारी करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात शिक्षकांना नेमकं काय शिकवणार?करिअर जागरूकता कार्यक्रम या उपक्रमाचे शाळा स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. करिअर जागरूकता कार्यक्रमात शिक्षकांना केवळ करिअर पर्यायांची माहितीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, योग्य मार्गदर्शन, आधुनिक अध्यापन तंत्र आणि श्रम बाजारातील बदल समजून घेण्यास मदत करणारे विविध कौशल्ये शिकवली जातात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य दिशा दाखवू शकतात. ही नवी योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

शिक्षक व समुपदेशकांची भूमिका ठरणार महत्वाचीदहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर जागरूकता कार्यक्रम अंतर्गत मुख्याध्यापक व समुपदेशकाकडून नवीन संधी कोणत्या मिळणार आहेत. यावर मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे हे कळणार आहे. यात समुदेशकांची

भुमिह शाळांचा सहभाग कसा ?केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा