शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या बसवर कार आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:16 IST

टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महामंडळाच्या बसला दारूची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डोंगरगावलगतच्या नारायणपूर शिवारात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुखरूप बचावले.

ठळक मुद्देदारूची अवैध वाहतूक : अपघातानंतर दारूची पळवापळवी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महामंडळाच्या बसला दारूची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डोंगरगावलगतच्या नारायणपूर शिवारात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना वाचविण्यापेक्षा कारमधील दारु लांबविण्यासाठी नागरिकांची झुंबड होती.शेख इब्राहिम, असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे. हा एमएच ३१, ईयू-४६७२ क्रमांकाच्या कारमध्ये नागपुरातून दारूसाठा घेऊन चंद्रपूरकडे जात होता. नारायणपूर शिवारात एमएच ४०, एक्यू ६३९४ क्रमांकाच्या बसचा टायर पंक्चर झाल्याने चालक व वाहक टायर बदलवित होते.यादरम्यान भरधाव येणाºया कारने बसला मागाहून जबर धडक दिली. यात कारचालक शेख इब्राहिम गंभीर जखमी झाल्याने तीन ते चार नागरिंकांनी लागलीच धाव घेत चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शंभरावर अधिक लोकांनी चालकाचा जीव वाचविण्यापेक्षा कारमधील दारू लांबविण्यासाठी धडपड चालविली होती. या वाहनाजवळ नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याने जखमीला बाहेर काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अरविंद येनुरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित, आशीष गेडाम यांनी पथकासह घटनास्थळ गाठून नागरिकांना बाजुला करीत जखमी चालकाला बाहेर काढून उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.दारूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची गरजवर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी असताना या दोन्ही जिल्ह्यात नागपुरातून दारूपुरवठा केला जातो. नागपुरातून भरलेल्या दारुची वाहतूक नागपूर ते चंद्रपूर या महामार्गाने होतात.रात्र-दिवस या महामार्गाने दारूची वाहतूक करणारे वाहने सुसाट धावत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्याची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघात