शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 17:51 IST

साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.  दीपक विठ्ठल गाढे (४०) व अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत.

वर्धा, दि. 17 -  साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. दीपक विठ्ठल गाढे (४०) व अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत. तर नितीन आनंद माने (४३) व मिलिंद शिंदे दोन्ही रा. सातारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील अथर्व शिंदे हा सातारा येथील आमदारांचा पुतण्या असल्याची माहिती आहे. पोलीा सुत्रानुसार, सातारा जिल्ह्यातील नितीन माने, दीपक गाढे, मिलिंद शिंदे आणि त्यांचा मुलगा अथर्व हे एम.एच. ११/ बी.एच. ४३८३ क्रमांकांच्या कारने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित जलतरण स्पर्धेकरिताजात होते. भरधाव कार नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात आली असता ती ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यांवर आदळली. यात दीपक व अथर्वचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारचालक नितीन माने व मिलिंद शिंदे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे निरज लोही व रंजन पाटील यांनी आपला चमुसह घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला. या घटनेची कारंजा (घा.) पोलिसांनी नोंद घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात