शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर कारचा अपघात; चार गंभीर जखमी

By चैतन्य जोशी | Updated: April 19, 2023 14:33 IST

सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु : जाम पोलिस अपघातस्थळी दाखल

वर्धा :समृद्धी महामार्गावरुन वाशिमकडे जाणारी कार अनियंत्रीत होऊन थेट रस्ता दुभाजकालगतच्या नालीत जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील तीन महिलांसह चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी १८ रोजी सायंकाळच्या सुमारास येळाकेळी इंटरचेंजपासून पाच कि.मी. अंतरावर झाला. जाम महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठविले. सरिता जयस्वाल, सविता जयस्वाल, लीला जयस्वाल आणि चालक इम्रान खान सर्व रा. वाशिम असे जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३७ व्ही. १७५७ क्रमांकाची कार इम्रान खान चालवित होता. तीन महिलांना घेऊन तो नागपूर येथून वाशिमकडे हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जात होता. येळाकेळी येथील इंटरचेंज पास करुन काही दूर अंतरावर गेल्यानंतर चालक इम्रान खान याला डुलकी आल्याने स्टेअरिंगवरुन त्याचे नियंत्रण सुटले अन् कार अनियंत्रीत झाली.

दरम्यान कार रस्ता सोडू थेट रस्ता दुभाजकाच्या मधातील नालीत जाऊन कोसळली.या अपघातात कार क्षतीग्रस्त झाली असून कारचालकासह कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातस्थळी तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतील डॉकटरांच्या चमूने प्राथमिक उपचार करुन सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. या अपघातस्थळी जाम महामार्ग पोलिसही दाखल झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwardha-acवर्धा