शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

उमेदवारांची संपत्ती अद्यापही ‘आॅफलाईन’

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

देशातील निवडणुका पारदर्शकरीत्या पार पडाव्या म्हणून निवडणूक आयोगाची रचना केली गेली़ यात केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाचा समावेश आहे़ या आयोगांद्वारे आदर्श आचारसंहिता

प्रशांत हेलोंडे - वर्धादेशातील निवडणुका पारदर्शकरीत्या पार पडाव्या म्हणून निवडणूक आयोगाची रचना केली गेली़ यात केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाचा समावेश आहे़ या आयोगांद्वारे आदर्श आचारसंहिता निर्माण करण्यात आली आहे़ यात उमेदवारावर बंधने घातली असून प्रशासनालाही काही नियम घालून दिले दिले आहेत; पण उमेदवारही चौकटीत राहत नाही आणि प्रशासनही नियम पाळत नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे़ लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च वर्धा निवडणूक विभागाने जाहीर केला नाही आणि आता विधानसभेत रिंगणातील उमेदवारांची संपत्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही़ यावरून निवडणूक यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते़ शिवाय उमेदवाराने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बुडविले तर नाही नाही, याचीही चौकशी केली जाते़ सध्या विधानसभा निवडणुकीचा फड रंगलेला आहे़ निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष अधिसूचना जारी केली जाते़ विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली़ यात २१ ते २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले़ यानंतर छाननी व अर्ज परत घेण्याची प्रक्रिया पार पडून १ आॅक्टोबरला चिन्हवापट व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली़ १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांच्या संपत्तीचा लेखाजोखा मतदारांना उपलब्ध होणे अनिवार्य होते़ यासाठी संबधित विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उमेदवारांचे अ‍ॅफिडेव्हिट लावले जाते़ शिवाय संकेतस्थळावरही ते उपलब्ध करून दिले जाते़ लोकसभा निवडणुकीमध्ये वर्धा मतदार संघामध्ये रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांचे अ‍ॅफिडेव्हिट मतदारांकरिता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते; पण विधानसभा निवडणुकीत प्रशासनाला यासाठी वेळच मिळाला नसल्याचे दिसून येते़ हा प्रकार केवळ वर्धा जिल्ह्यातच घडतोय, असे नव्हे तर राज्यातील २८८ पैकी शंभरांवर मतदार संघातील उमेदवारांचे अ‍ॅफिडेव्हिट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे सदर संकेतस्थळ तपासल्यास दिसून येते़ वर्धा जिल्ह्यातील केवळ हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांचे अ‍ॅफिडेव्हिट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे़ उर्वरित आर्वी, देवळी आणि वर्धा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण मतदारांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही़ लगतच्या अमरावती जिल्ह्यातील ३६ धामणगाव (रेल्वे), ३७ बडनेरा, ३८ अमरावती व ३९ तिवसा या चार मतदार संघांतील उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाईन उपलब्ध नाही़ केंद्र आणि राज्य शासनानेच आॅनलाईन सेवेवर अधिक भर दिलेला आहे़ यामुळेच प्रत्येक बाबी संगणकावर उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे़ निवडणूक प्रक्रियेलाही यातून वगळण्यात आलेले नाही़ यामुळे निवडणुकीचे तपशीलही संकेतस्थळावर देणे बंधनकारक करण्यात आले आहे़ शिवाय निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर झालेला खर्चही सादर करावा लागतो़ असे असले तरी लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च वर्धा निवडणूक विभागाच्यावतीने अद्यापही सादर करण्यात आलेला नाही़ आॅनलाईन सेवेचा गवगवा केला जात असताना महत्त्वाच्या निवडणुकांचा तपशील अद्याप देण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील १४ उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण असलेले ‘अ‍ॅफिडेव्हिट’ ‘अपलोड’ केले जाऊ शकते तर अन्य मतदार संघातील का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ वर्धा विधानसभा मतदार संघात २९, देवळी मतदार संघात १९ आणि आर्वी मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात आहेत़ यातील किती उमेदवार कोट्यधीश, किती लक्षाधीश आहे, कुणाकडे कोणती संपत्ती अधिक आहे, ही माहिती अ‍ॅफिडेव्हिटमधून मतदारांना मिळते़ शिवाय कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत, कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली वा निर्दोष मुक्तता झाली, कोणते प्रकरण न्यायालयात आहे, हे कळते; पण अद्यापही अ‍ॅफिडेव्हिट अपलोड करण्यात आलेले नाही़ प्रत्येक मतदार निवडणूक कार्यालयात जाऊन अ‍ॅफिडेव्हिट तपासू शकत नाही़ यामुळे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे़