शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या गळाला लागला, चौघांना अटक; सात दुचाकी हस्तगत 

By चैतन्य जोशी | Updated: August 8, 2023 19:29 IST

पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पुलगाव येथून दुचाकी चोरून वर्ध्यात दुचाकी विकायला येणाऱ्या चोरट्यांना अटक करून दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. ही कारवाई ७ रोजी दयालनगर परिसरातील रेल्वे प्रवेशद्वारासमोर करण्यात आली.कौशिक बिजेश तिवारी, राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, पुलगाव परिसरात दुचाकी चोरींच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 त्यानुसार चोरट्यांचा आणि दुचाकींचा शोध पोलिसांकडून कसोशीने घेतला जात होता. दरम्यान पोलिस पथकाला चोरीची दुचाकी विकण्यासाठी दयालनगर परिसरात चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दयालनगर परिसरात सापळा रचला असता एका दुचाकीवर दोन संशयित व्यक्ती बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव कौशिक तिवारी आणि दुसरा अल्पवयीन दोघही भीमलाइन पुलगाव असे सांगितले. दुचाकीबाबत विचारणा करून पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी दुचाकी पुलगाव परिसरातून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी समांतर तपास करून पुलगाव परिसरातून सात चोरीतील दुचाकी विविध ठिकाणाहून हस्तगत केल्या. 

तसेच चोरीतील दुचाकी विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुयल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, रामदास खोत, मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, अक्षय राऊत, शिवकुमार परदेशी, गणेश खेवले यांनी केली.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यतापुलगाव हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीचे सातही गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी