खरेदी प्रारंभ : मुहुर्ताला २५० क्विंटल आवकदेवळी : स्थानिक माँ नरसाई जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरे यांच्या हस्ते काटापुजन करून मुहूर्त साधण्यात आला. अतिथी म्हणून संचालक प्रदीप लुटे, संजय लांबट, सुशील तिवारी तसेच महेश अग्रवाल, विनोद घीया, अमिन सुराणा आदींची उपस्थिती होती.या खरेदीच्या मुहूर्तावर २५० क्विंटल कापसाची खरेदी करून प्रतिक्विंटल ५,१०१ रूपये भाव देण्यात आला. जिनिंगचे मालक जगदीश ज्योतवानी यांच्या हस्ते मंगेश मेघरे, देविदास सुरकार, मंगेश सायंकार यांचा नारळ पान व दुपट्टा देवून सन्मान करण्यात आला.(प्रतिनिधी)
कापसाची प्रतिक्विंटल ५,१०१ दराने खरेदी
By admin | Updated: November 16, 2016 00:59 IST