शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.

ठळक मुद्देवर्धा कार्यालयातील प्रकार : ग्राहकांना होतोय मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाने दूरध्वनी बिलाचा भरणा केल्यानंतरही भारत संचार निगमकडून ऑनलाईन पावती वेळीच दिली जात नसून कागद उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने या विभागाला उतरती कळा लागली की काय, अशी चर्चा ग्राहकांत आहे.तक्रार करूनही दूरध्वनी सेवेतील बिघाड वेळीच दुरुस्त न करणे, इंटरनेट सुविधेत सातत्याने निर्माण होत असलेला तांत्रिक बिघाड, गती कमी असणे तर कधी-कधी सेवा पूर्णत: ठप्प असणे आदी कारणांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. याचाच परिणाम, बीएसएनएल खासगी कंपन्यांच्या तुलनेत सेवा देण्यात पिछाडली असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने घरोघरी दिसणारे टेलिफोन अडगळीत पडले.अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.मुद्रित पावती देण्याकरिता कागद, अ‍ॅडव्हान्स प्राप्त झालेला नाही, प्रिंटरमध्ये बिघाड आहे, अशी बेजबाबदार उत्तरे देऊन ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही अंकुश नाही. बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत धडे द्यावेत, देयकाचा भरणा केल्यानंतर तत्काळ पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता दूरसंचारचे जिल्हा व्यवस्थापक संजयकुमार इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेतो, असे म्हणून त्यांनी दूरध्वनी बंद केला.दोन महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी वेतनाविनाबीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन नाही. यामुळे अनेकांचे बँका, विम्याचे हप्ते थकले असून आर्थिक संकट ओढवले आहे. वेतन नियमित मिळाले असते तर कागद खरेदी करता आली असती. मात्र, मुख्य कार्यालयाकडूनच अ‍ॅडव्हान्स वेळीच प्राप्त होत नसल्याने ही समस्या उद्भल्याचेही विभागीय अभियंता विजय ढोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक