शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री थरार! धारदार शस्त्राने सपासप वार करून दारूविक्रेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 15:36 IST

जुन्या वादातून दारूविक्रेत्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० च्या सुमारास गोंडप्लॉट परिसरात घडली.

ठळक मुद्देजुना वाद गेला विकोपाला १५ वार अन् कोथळाच काढला बाहेरगोंडप्लॉट परिसरातील घटना

वर्धा : जुन्या वैमनस्यातून दारूविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करत  निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारूविक्रेत्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर किरायाने खोली घेतली होती. त्या खाेलीतून तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला भ्रमणध्वनी करून जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरू असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले.

याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मनोजची पत्नी कोमल धानोरकर रा. केळकरवाडी हिने शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करून उर्वरित पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, नरेंद्र कांबळे, संजय पंचभाई यांच्यासह शोध पथकाने तपासकार्य सुरू केले. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

मृतक आरोपी दोघेही दारूविक्रेते

मृत मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतकावर विविध गंभीर गुन्हे दाखल

मृत मनोज धानोरकर हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर शहर ठाण्यात जीवे मारण्याचा हल्ला, जबर मारहाण आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तो किरायाने घेतलेल्या खोलीतून दारूविक्री करायचा. त्याच खोलीत शनिवारी मध्यरात्री त्याचा सहा जणांनी ‘गेम’ केला. आरोपी आकाश जयस्वाल हा देखील दारूविक्रेता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१५ वार अन् कोथळाच काढला बाहेर

मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारूअड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे १५ ते २० वेळा सपासप वार करून मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू