शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:15 IST

दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली.

ठळक मुद्देकारवाई न करण्यासाठी मागितले पाच हजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली. त्या आधारे शनिवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत लाचखोर पोलीस हवालदार अशोक दीक्षित याने लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविल्याने व ते सिद्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार याचा त्याचे चुलत भावासोबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तक्रारदारोविरूद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे त्यांचे चुलत भावाच्या ेतक्रारीवरून योग्य कारवाई करण्यात आली. याच प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदाराने पोलीस हवालदार अशोक दीक्षित याची भेट घेतली. त्यावेळी दीक्षित याने सदर प्रकरणी कुठलीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांचेकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची दखल घेवून ६ आॅक्टोबरला लाच मागणी संबंधाने पडताळणी केली असता अशोक दीक्षित याने ताडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचेविरूद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक संशोधन अधिनियम २०१८ च्या कलम ७ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाचचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुबलवार, लाचचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामजी ठाकुर, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, विजय उपासे, सागर भोमले, प्रदीप कुचनकर, कैलास वालदे, अपर्णा गिरजापुरे, स्मिता भगत, श्रीधर उईके आदींनी केली. लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी