शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:51 IST

शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!

ठळक मुद्देसहा लाखांचा ऐवज लंपास : रामनगर, हिंदनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!माजी जि.प. सदस्य अमित विजयसिंग ठाकूर हे दोन महिन्यांपासून स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या धोंगडे यांच्या घरी किरायाणे राहत आहे. अमित ठाकूर हे कुटुंबीयांसह गोवा येथे फिरायला गेले असता चोरट्याने त्यांच्या कुलूप बंद घरात प्रवेश करून घरातील आलमारीतून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल्याचे सांगण्यात आले. बुधवारी गोवा येथून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.दुसरी घटना शहरातीलच हिंदनगर येथे घडली. तेथील रमेश गुलाब गजभिये (६१) हे कुटुंबीयांसह कर्करोगग्रस्त असलेल्या बहिणीला अमरावती येथे भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, गजभीये यांच्या कुलूप बंद घरात चोरट्याने प्रवेश करून रोख १७ हजार रुपये, एक महागडा कॅमेरा तसेच सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.दोन्ही प्रकरणात रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.चोरीनंतर आलमारी केली व्यवस्थित बंदमाजी जि.प. सदस्य अमित ठाकूर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने ज्या लोखंडी आलमारीतून सोन्याचा ऐवज लांबविला, त्याच आलमारीत वरच्या कप्प्यात चांदीचे साहित्यही होते; पण चोरट्याने त्याला हातही लावला नाही. शिवाय ज्या आलमारीतून सदर मुद्देमाल चोरून नेला, ती आलमारी चोरट्याने काम फत्ते केल्यानंतर व्यवस्थित बंद करून ठेवली होती. यामुळे चोरटाही तज्ज्ञच होता काय, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. तत्सम चर्चाही रामनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांमध्ये सुरू होती.श्वानपथक ठरले अपयशीघटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या घरांची बारकारईने पाहणी केल्यानंतर चोरट्यांबाबतचा थोडातरी सुगावा लागावा या हेतूने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने तब्बल तासभर दोन्ही घटनास्थळी चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हा