शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

गिरड टेकडीवरील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत

By admin | Updated: July 12, 2015 02:20 IST

येथील शेख फरिदबाबा दर्गाह टेकडीवरील सुरक्षा रक्षकांना शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून दानपेटी फोडल्याची घटना ५ जुलैच्या रात्री घडली होती.

गिरड : येथील शेख फरिदबाबा दर्गाह टेकडीवरील सुरक्षा रक्षकांना शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून दानपेटी फोडल्याची घटना ५ जुलैच्या रात्री घडली होती. याप्रकरणी गिरड पोलिसांनी दोन आरोपींना शुक्रवारी रात्री नागपूर येथून ताब्यातंं घेतले आहे. त्यांचा एक सहकारी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. संजय दमडू धरबेहरा (२५) रा. ओडिशा आणि रोहित ऊर्फ सुनील कोणुलाल पंतेश्वर (२६) रा. छत्तीसगड दोघांचाही ह.मु. रामकृष्णनगर, नागपूर अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. या घटनेत चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच दर्गाहमधील सीसी टिव्ही कॅमेरे आणि सेट टॉप बॉक्सही पळविला होता. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या वर्णनावरून यातील संशयित आरोपींचे स्केच बनविण्यात आले होते. सदर आरोपी नागपूर येथील रामकृष्ण नगरमध्ये असल्याची माहिती गिरड पोलिसांना मिळाली. तत्पूर्वी यातील एका आरोपीच्या बहिणीची माहिती मिळाली. तिचे घर गाठत माहिती विचारली असता सदर आरोपी हे ताजबाग मार्गावरील रामकृष्णनगरमध्ये राहत असल्याचे उघड झाले. येथून पोलिसांनी संजय आणि सुनीलला ताब्यात घेतले. दोघांनाही गिरड येथील टेकडीवर आणत सुरक्षा रक्षकांकडून ओळख पटविण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी हेच लुटारू असल्याचे सांगितले. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि.१३) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई एसडीपीओ वासुदेव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, दादा शंभरकर, शरद इंगोले, धनराज सयाम आदींनी केली.(वार्ताहर)