शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:02 IST

दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसिंचन व्यवस्था कोलमडली : नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; आकाशाकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.नदीने सुबत्ता आणि समृद्धी दिल्याने नदीकाठावरची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, यावेळी पर्जन्यमानाचा चांगलाच फटका बसला. जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असला तरी दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने देर्डा आणि सावंगी या दोन गावांमधून आणि संगम असलेल्या बोर व धाम नदीपात्रात ठणठणाट असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नदीकाठावरील शेतात सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. पिकांना पावसाची गरज आहे; मात्र वरूणराजा रूसल्याने आणि नदी कोरडी असल्याने सिंचन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.अंतसंस्काराचे सोपस्कार नदीवर केले जातात; पण नदी कोरडी आहे. त्यामुळे डोहच आधार आहे, पण त्यावरही शेवाळ तयार झाले आहे. मात्र विधीचे काम असल्याने पाणी कसेही का असेना सोपस्कार उपलब्ध पाण्यात उरकविण्यात येत आहे. डोहालाही कोरड पडली होती; पण उन्हाळ्यात देर्डा येथील विहिरीचे खोलीकरण आणि बांधकाम करण्यात आले. त्यावेळी विहिरीचे पाणी डोहात सोडण्यात आल्याने डोहात पाणी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रानात चारा नाही, पाणी नाही. त्यामुळे घरीच गोपालक आणि मालकांना जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. भर पावसाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे पाणीपातळी वेगाने खाली जात आहे. शेतात वाळण येत असून जनावरेदेखील सावलीचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. अल्पशा पावसामुळे नदी, नाले अद्याप कोरडे आहेत. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या घशाला कोरड पडणार, यात शंका नाही.जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांची भिस्त केवळ आॅगस्ट महिन्यावर आहे. सर्वांनाच धो-धो पावसाची प्रतीक्षा असून नागरिक आकाशाकडे टक लावून पाहत एकदा तरी मनसोक्त कोसळ, अशी आळवणी परमेश्वराला नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपात