शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

बोर व्याघ्र प्रकल्पाची देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:54 IST

२० दिवसांत ७९७ पर्यटकांची जंगल सफारी : गत महिन्याच्या तुलनेत आठ पटीने वाढ

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समृद्ध निसर्ग, भरपूर वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील घसरण घाटाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. याठिकाणी वाघ, बिबट, अस्वलांसह अन्य पशू-पक्ष्यांचे सहज दर्शन होत असल्याने गत २० दिवसांत ७९७ पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. गत महिन्याच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत आठ पटीने वाढ झाली आहे. यात देशी-विदेशी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

बोर नदीच्या १४० चौरस किलोमीटर परिसरात हा व्याघ्र प्रकल्प असून, जवळच सिंचन प्रकल्पही आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात येणारे वन्यप्राणी येथे हमखास आढळतात. वाघासह बिबट, सांबर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, भेकळ, अस्वल, रानमांजर, रानकुत्रे या प्राण्यांसह विविध प्रजातींचे पक्षी, वृक्ष आदी वनसंपदा मोठ्या प्रमाणात आढळून येते. 

उंच सखल डोंगर रांगा, त्यामधून निघणारे गुळगुळीत दगड गोट्यांचे नाले, नाल्यांमधून पळताना दिसणारे मुंगूस, अर्जुनाच्या झाडावर बसून आढळणारा तुरा असलेला गरुड, गाडीच्या आवाजाने पळणारे हरणांचे कळप, वेगवान पळणाऱ्या नीलगायी, मोठ्या जलाशयापाशी आढळणारे पक्षी, नजर चुकवून जाणारा बिबट, अचानक होणाऱ्या आवाजाने गांगारलेली अस्वलं, शिकारी षडयंत्र रचून बसणाऱ्या रानकुत्र्यांचा जमाव, पावलोपावली दिसणारे मोर, जंगली कोंबड्या, जंगल बुश, झाडांच्या खोडात लपणारे घुबड, अशी ही जैवविविधता वाघाचे दर्शन पर्यटकांना खुणावतोय. 

जंगलात येणारे अनेक पर्यटक जवळजवळ वाघाच्या दर्शनासाठी येतात. एकदा जंगलात भ्रमंतीसाठी निघाल्यावर वाघ आपल्याला कोणत्या पाणवठ्यावर, नाल्यात, झाडाखाली, विश्रांती घेताना कोणत्या अवस्थेत दर्शन देईल हीच एक आस असते. पर्यटक वनाचा आनंद दिवसाढवळ्या घेतात; परंतु जंगलांचे रात्रीचे सौंदर्यही अप्रतिम आहे. 

बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे संवर्धन होण्याकरिता वनाधिकारी रात्रंदिवस गस्त घालत असतात. अवैध वृक्षतोड, चटाई, वन्यजीव शिकार यापासून डोळ्यांत तेल घालून जंगलाचे रक्षणही करण्यात येते. जाणूनबुजून लावणाऱ्या आगीपासून जंगल वाचविण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने होतो. 

दोन महिन्यांत ९०६ पर्यटकांची जंगल सफारी दोन महिन्यांपूर्वी बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आहे. विदर्भातील इतर अभयारण्यांप्रमाणेच बोर प्रकल्पातही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. इथे पर्यटकांना दररोज सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ६ या वेळात सफारीचा आनंद घेता येतो. ऑक्टोबर महिन्यात २४४ वाहनांतून १०९ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेटी दिल्या. तेच १ ते २० नोव्हेबरदरम्यान तब्बल ७९७ पर्यटकांनी भेटी दिल्या. दोन महिन्यांत ९०६ पर्यटकांनी भेटी निसर्गपर्यटनाचा आनंद घेतला आहे. यातून वन विभागाला ३ लाख ८७ हजार ४४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

जैवविविधतेने नटलेला बोर व्याघ्र प्रकल्पबोर व्याघ्र प्रकल्प परिसरात आमगाव बिटमध्ये जंगली मांजराचे वास्तव्य आहे. जंगली मांजर हे बोर व्याघ्र प्रकल्पाचे आकर्षण ठरले आहे. त्यासोबतच रानगवा (बायसन), रानकुत्रे (वाइल्ड डॉग) आदी प्राणी सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात. समृद्ध निसर्ग, भरपूर वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. 

येथे स्थानांतरित पक्षांचे थवे व्याघ्र प्रकल्पातील भुलाई डोह, मोहाची बशी, गव्हाण खेडी पाणवठा, घसरण घाट पाणवठा, ओबेरॉय बशी, बोर धरणाचे बैंक वॉटर आदी भागांत वाघ, बिबटे, अस्वल, रानकुत्रे, चितळ, सांबर, नीलगायी, तसेच स्थानांतरित पक्ष्यांचे दर्शन होते.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पwardha-acवर्धा