लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथील पार्थ कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागने अप्रमाणित बियाणे व बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कृषी केंद्राचे मालक व नकली नोटा प्रकरणातील आरोपी राजू भास्कर इंगाले याच्याविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी राजू इंगोले हा नांदोरा (डफरे) येथील रहिवासी असून त्याने याठिकाणी चार वर्षांपूर्वी पार्थ कृषी केंद्र उघडले होते. या पूर्वीसुद्धा या कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे व बोगस खतांची विक्री करून परिसरातील शेतकऱ्यांची लूट केली. ुपरंतु, शेतकरी नकार देत नसल्याने आरोपीचे चांगलेच फावत होते. परंतु दरम्यानच्या काळात इंगोलेला बनावट नोटा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतरच्या चौकशीत त्याच्या गोदामात बोगस खतही आढळून आल्याने नांदोरा येथील पार्थ कृषी केंद्रावर छापा घालून कारवाई केली. येथून १२५ पोती बोगस खत व अप्रमाणित बियाणेही जप्त करण्यात आले. आरोपीने अनधिकृतपणे खताचा साठा करून जीवनावश्यक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई देवळी पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रणक प्रशांत भोयर यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून भोयर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
बोगस रासायनिक खत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:01 IST
तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथील पार्थ कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागने अप्रमाणित बियाणे व बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कृषी केंद्राचे मालक व नकली नोटा प्रकरणातील आरोपी राजू भास्कर इंगाले याच्याविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
बोगस रासायनिक खत जप्त
ठळक मुद्देनांदोरा (डफरे) येथील पार्थ कृषी केंद्रावर कृषी विभागाचा छापा