शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधितांनी वर्ध्यात ठेवला देह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

ठळक मुद्दे४७८ मृतदेहांवर झाले अंत्यसंस्कार : दहा महिन्यांपासून स्मशानभूमीत अग्निदाह

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जी जन्मभूमी आहे... जी कर्मभूमी आहे... त्याच ठिकाणी आयुष्याचा शेवट झाल्यानंतर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी आपल्याकडील परंपरा आहे. पण, कोरोनायनाने ही परंपराही मोडीत काढली आहे. असंख्य रुग्ण आपल्या जिल्ह्याच्या, प्रांताच्या सीमा ओलांडून वर्ध्यातील रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल झाले. उपचारादरम्यान त्यातील काही रुग्णांनी अखेरचा श्वास घेतल्याने या सर्वांवर वर्ध्यातीलच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. शहरातील स्मशानभूमीत गेल्या दहा महिन्यांपासून अग्निदाह सुरूच असून, आता कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे.जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णांना इतरही आजार असल्याने बहुतांश रुग्णांनी दवाखान्यातच जगाचा निरोप घेतला. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता वर्ध्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत तब्बल ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा यासह हरियाणा, अदिलाबाद, बालाघाट, बैतुल येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमीही कोरोनाकाळात अनेकांसाठी अखेरचा विसावा ठरली आहे.

वाशिमच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू ठरला जिल्ह्यात पहिला जिल्ह्यात १० मे रोजी आर्वी तालुक्यातील हिवरातांडा येथील महिला रुग्णाचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या तारखेला पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत गेली. २९ मे २०२० ला वाशिम येथील कोरोनाबाधिताचा वर्ध्यात मृत्यू झाला. हा पहिला मृत्यू ठरल्याने शहरातील स्मशानभूमीत या पहिल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर १० मार्च २०२१ पर्यंत ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. यापैकी ३७१ मृत रुग्ण हे वर्धा जिल्ह्यातील असून इतर बाहेर जिल्ह्यांतील आहेत. 

येथे नि:शुल्क सेवावर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमीचे काम सांभाळले जाते. येथे कोरोनाबाधित मृतदेहांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेसात मन लाकूड, ५० गोवऱ्या, साडेपाच लीटर डिझेल आणि हमाली चार्ज असा ३ हजार १२० रुपयांचा खर्च येतो. हा सर्व खर्च पालिका करित आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शहरातील मुख्य स्मशानभूमीत नि:शुल्क अंत्यसंस्कार केले जात आहेत. याचा खर्च सुुरुवातीला नगरपालिकेच्या फंडातून केला जात होता. पण, शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यापासून नगरपालिकेला मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून तो खर्च भागविला जात आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची पूर्ण व्यवस्था या स्मशानभूमीमध्ये करण्यात आली आहे. येथे कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.- विपीन पालिवाल,मुख्याधिकारी, न.प. वर्धा 

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेचारशेपेक्षा अधिक अंत्यसंस्कार झाले आले. मृतदेह येणार असल्याची माहिती मिळताच सर्व साहित्य तयार ठेवले जाते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. यादरम्यान परिवारातील सदस्यांच्याही काही ईच्छा पूर्ण करावी लागतात.- दिलीप कुथे, कर्मचारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या