आपल्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधितांनी वर्ध्यात ठेवला देह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:00 AM2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:07+5:30

जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

The body was placed in Wardha by the Coronadians across the district boundary | आपल्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधितांनी वर्ध्यात ठेवला देह

आपल्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधितांनी वर्ध्यात ठेवला देह

Next
ठळक मुद्दे४७८ मृतदेहांवर झाले अंत्यसंस्कार : दहा महिन्यांपासून स्मशानभूमीत अग्निदाह

आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जी जन्मभूमी आहे... जी कर्मभूमी आहे... त्याच ठिकाणी आयुष्याचा शेवट झाल्यानंतर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी आपल्याकडील परंपरा आहे. पण, कोरोनायनाने ही परंपराही मोडीत काढली आहे. असंख्य रुग्ण आपल्या जिल्ह्याच्या, प्रांताच्या सीमा ओलांडून वर्ध्यातील रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल झाले. उपचारादरम्यान त्यातील काही रुग्णांनी अखेरचा श्वास घेतल्याने या सर्वांवर वर्ध्यातीलच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. शहरातील स्मशानभूमीत गेल्या दहा महिन्यांपासून अग्निदाह सुरूच असून, आता कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे.
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 
या रुग्णांना इतरही आजार असल्याने बहुतांश रुग्णांनी दवाखान्यातच जगाचा निरोप घेतला. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता वर्ध्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत तब्बल ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा यासह हरियाणा, अदिलाबाद, बालाघाट, बैतुल येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमीही कोरोनाकाळात अनेकांसाठी अखेरचा विसावा ठरली आहे.

वाशिमच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू ठरला जिल्ह्यात पहिला
 जिल्ह्यात १० मे रोजी आर्वी तालुक्यातील हिवरातांडा येथील महिला रुग्णाचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या तारखेला पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत गेली. २९ मे २०२० ला वाशिम येथील कोरोनाबाधिताचा वर्ध्यात मृत्यू झाला. हा पहिला मृत्यू ठरल्याने शहरातील स्मशानभूमीत या पहिल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर १० मार्च २०२१ पर्यंत ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. यापैकी ३७१ मृत रुग्ण हे वर्धा जिल्ह्यातील असून इतर बाहेर जिल्ह्यांतील आहेत.
 

येथे नि:शुल्क सेवा
वर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमीचे काम सांभाळले जाते. येथे कोरोनाबाधित मृतदेहांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेसात मन लाकूड, ५० गोवऱ्या, साडेपाच लीटर डिझेल आणि हमाली चार्ज असा ३ हजार १२० रुपयांचा खर्च येतो. हा सर्व खर्च पालिका करित आहे.
 

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शहरातील मुख्य स्मशानभूमीत नि:शुल्क अंत्यसंस्कार केले जात आहेत. याचा खर्च सुुरुवातीला नगरपालिकेच्या फंडातून केला जात होता. पण, शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यापासून नगरपालिकेला मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून तो खर्च भागविला जात आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची पूर्ण व्यवस्था या स्मशानभूमीमध्ये करण्यात आली आहे. येथे कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
- विपीन पालिवाल,मुख्याधिकारी, न.प. वर्धा
 

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेचारशेपेक्षा अधिक अंत्यसंस्कार झाले आले. मृतदेह येणार असल्याची माहिती मिळताच सर्व साहित्य तयार ठेवले जाते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. यादरम्यान परिवारातील सदस्यांच्याही काही ईच्छा पूर्ण करावी लागतात.
- दिलीप कुथे, कर्मचारी

 

Web Title: The body was placed in Wardha by the Coronadians across the district boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.