वर्धा : सध्या सर्वत्र थंडीची लाट आहे़ या कडाक्याच्या थंडीत सामान्य नागरिक आपल्या शरीराला ऊब देऊ शकतात; पण पैसा, निवारा नसलेल्या व्यक्तींना उघड्यावरच जगावे लागते़ अशा नागरिकांसाठी काहीतरी करावे म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचाने अनोक उपक्रम राबविला़ यात शहरातील वंचितांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले़ गत काही दिवसांपासून सर्वत्र थंडीची लाट आहे़ तापमान १० ते ७ अंशांपर्यंत खाली आले आहे़ अशा कडाक्याच्या थंडीत सामान्य नागरिक किमान घरात राहुन थंडीपासून बचाव करू शकतात; पण रस्त्यावरचे जीणे जगणाऱ्यांना या मरणाच्या थंडीचा सामना करावा लागतो़ ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचाद्वारे हा उपक्रम हाती घेण्यात आला़ यातील डॉक्टरांनी शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, मुख्य बाजार, साई मंदिरव फुटपाथवर जगणाऱ्या वंचितांना ब्लँकेटचे वितरण केले़ हा उपक्रम रात्री १२ ते १़३० च्या सुमारास राबविण्यात आल्याने ज्यांना खरच या ब्लँकेटची गरज होती, त्यांच्या अंगावर ते पांघरून देण्यात आले़ या उपक्रमात डॉ़ अजय मेहरा, डॉ़ अर्चना मेहरा, डॉ़ संजय शेंदरे, डॉ़ राजेंद्र पुनसे, डॉ़ विनय लोखंडे, डॉ़ किशोर चौधरी नागपूर, ठवकस, रवी अडवाणी, महेश अडसुळे आदींनी सहकार्य केले़ या उपक्रमात वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ़ सचिन पावडे, डॉ़ शंतनू चव्हाण, डॉ़ स्वप्निल तळवेकर, डॉ़ नहुश घाटे, डॉ़ यशवंत हिवंज, डॉ़ प्रवीण सातपुते, डॉ़ अरविंद वंजारी, डॉ़ आनंद गाढवकर, डॉ़ निखील ताल्हन, डॉ़ नितीन मेशकर, डॉ़ चंद्रकांत जाधव, डॉ़ अजय निंबलवार, डॉ़ मोहन पोकळे, डॉ़ महेंद्र भगत, डॉ़ जयंत ेगांडोळे, डॉ़ प्रशांत वाडीभस्मे, डॉ़ सतीश हरणे, डॉ़ राजेश आसमवार, डॉ़ राधाकृष्ण सायरे, डॉ़ अभिजीत खणके, डॉ़ विजय शादीजा आदींनी प्रत्यक्ष सहभाग घेत ब्लँकेटचे वितरण केले़(कार्यालय प्रतिनिधी)
डॉक्टरांकडून वंचितांना ब्लँकेटची ऊब
By admin | Updated: January 8, 2015 22:59 IST