शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

समाजहिताच्या कामांवर ठपका; तर खऱ्या अतिक्रमणाकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

महाकाली सेवा मंडळाच्या वतीने पांदण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करीत त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ऊन, पावसापासून बचाव व्हावा या हेतूने मंदिर मार्गावर टिनाचे शेड बांधण्यात आले आहे. पण, याच समाजोपयोगी कामावर अतिक्रमणाचा ठपका वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला-पुरुषांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहही बांधण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : श्रीक्षेत्र महाकाळी येथील मंदिरावर राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या परिसराला शासनाने ‘क’ पर्यटनस्थळ जाहीर केले आहे. पण, याच मंदिर परिसरात भाविकांना प्राथमिक सोयी-सुविधा मिळेल अशी काही समाजहिताची कामे केली असता त्यावर वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने अतिक्रमणाचा ठपका ठेवला जात आहे. तर त्या व्यक्तीने शासनाची दिशाभूल करून नवीन सुरक्षा भिंत बांधून पांदण रस्ताच अरुंद केला, त्याला वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने अभय दिले जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ११ सप्टेंबर २०९० च्या पत्राद्वारे महाकाळी येथील नवरात्री उत्सवाची संपूर्ण जबाबदारी जय महाकाली सेवा मंडळाकडे दिली आहे. तर, सहा. मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग नागपूर यांनी प्रधान सचिव पाटबंधारे विभाग मुंबई यांना दिलेल्या १७ ऑगस्ट १९९३ च्या पत्राद्वारे आवश्यकतेपेक्षा जास्त असलेली जमीन, तसेच सदर जमीन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने तहसीलदारांमार्फत जय महाकाली सेवा मंडळाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्धा यांनी २९ मार्च २०९४ ला दिलेले पत्रान्वये धाम जलायशामुळे प्रकल्पबाधित झालेल्या मासोद या गावाच्या पुनर्वसित गावठाण भागात बांधण्यात आलेल्या महाकाली मंदिराचा ताबा सेवा मंडळाला देण्याचे निश्चित केले आहे. पण, दुर्लक्षित धोरणांमुळे या मंदिराची दैनावस्था होत आहे. तर, आता महाकाली सेवा मंडळाच्या वतीने पांदण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करीत त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ऊन, पावसापासून बचाव व्हावा या हेतूने मंदिर मार्गावर टिनाचे शेड बांधण्यात आले आहे. पण, याच समाजोपयोगी कामावर अतिक्रमणाचा ठपका वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला-पुरुषांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहही बांधण्यात आले आहे. पण, विकासकामांना हेतुपूर्वक विरोध केला जात आहे. तर ज्या व्यक्तीने शासनाची दिशाभूल करून मंदिराकडे येणारा पांदण रस्ता अरुंद होईल या उद्देशानेच जुन्या सुरक्षा भिंतीला डावलत नवीन सुरक्षा भिंत बांधली त्याला पाटबंधारे विभागाकडून अभय दिले जात असल्याचे याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.

आम्ही सुरू असलेले काम थांबविण्यासाठी नोटीस बजावली. पण त्याला बगल दिल्याने अखेर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आम्ही शासकीय नियमांना अनुसरून काम करीत आहोत. शासकीय नियमांना डावलणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होईलच.- जलेश सिंग, सहा. कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण