शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

‘कंट्रोल’च्या तांदळाचा काळाबाजार; मालवाहूसह १४.४६ लाखांचा साठा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: July 18, 2023 15:29 IST

दोघांना ठोकल्या बेड्या : कोल्ही शिवारात समुद्रपूर पोलिसांची कारवाई

वर्धा : रेशन दुकानात वापरण्यात येणारा शासकीय तांदूळ विना परवाना गोदामातून मालवाहू वाहनात भरुन वाहतूक करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक करुन तांदळाचा काळाबाजार उद्धवस्त केला. ही कारवाई कोल्ही शिवारात समुद्रपूर पोलिसांनी १७ रोजी केली. श्रीकांत प्रभाकर शिंगरु (२६) रा. हिंगणघाट, अंकित धर्मेंद्र कराडे (२६) रा. वाकधरा ता. वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, समुद्रपूर पोलिसांचे पथक अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने जात असताना कोल्ही शिवारातील गोदामातून शासकीय तांदळाचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कोल्ही शिवार गाठून वामण भाईमारे यांच्या शेतातील गोदामात छापा मारला असता एम.एच. ३४टी. १३४५ क्रमांकाचा मालवाहू गोदाम परिसरात उभा दिसला. पोलिसांनी चालकास ताब्यात घेत मालवाहूची पाहणी केली असता यात रेशनच्या तांदळाचे १४६ कट्टे आढळून आले. पोलिसांनी चालक व क्लिनरला परवान्याची विचारणा केली असता चालकाने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.

रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह तांदळाचे पोते असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक प्रेमराज अवचट यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत काळे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा