शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

भाजपचा जिल्हाभरात ‘दूध एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भाव पडले आहे.

ठळक मुद्देकुठे रस्त्यावर दूध ओतून, तर कुठे नागरिकांना वाटून सरकारचा निषेध। हिंगणघाटात मनसेने, वर्ध्यात किसान सभेने केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या संक्रमणात आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुधाला प्रतिलिटर १० रुपये व पावडरला प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको, दूध वाटप, आणि रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.वर्धा : भाजपने वर्धा-यवतमाळ मार्गावर दूध एल्गार आंदोलन केले. आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दूध उत्पादक अडचणीत आले. गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भाव पडले आहे. त्याचप्रमाणे ऐन हंगामात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा तसेच घरगुती ग्राहकांना अवास्तव वीज बीलामुळे सामान्यजनांचे कंबरडे मोडले आहे. यासाठी आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करून निषेध करण्यात आला. दुधाने भरलेल्या कॅन दुसऱ्या भांड्यात पालथ्या पाडून सांकेतिक आंदोलन करण्यात आले. यावेळी यावेळी भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने, तालुकाध्यक्ष दशरथ भुजाडे, शहर अध्यक्ष रवी कारोटकर, राहुल चोपडा, बंडू जोशी, शरद आदमने, नरेंद्र मदनकर, नदंू वैद्य, अंकित टेकाडे, पिंटू भानारकर, उमेश कामडी, गुणवंत चांदेकर, दीपक घोडे, गजानन हिवरकर, चंदू पोटे, अशोक देशमुख, प्रवीण येसनखेडे, रवींद्र ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.वायगाव (नि.) : भाजपा सेवाग्राम मंडळाच्यावतीने वायगाव निपाणी चौकात दूध दरवाढ तसेच वीज देयक माफीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज वितरणच्या कार्यालयासमोर जात वीज बिलाची होळी करण्यात आली. बसस्थानकाजवळ दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनात किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत इंगळे तिगावकर, भाजपचे महासचिव मिलिंद भेंडे, सचिव जयंत येरावार, पंचायत समिती सभापती महेश आगे, सेवाग्राम मंडळाचे अध्यक्ष विवेक भालकर, सरपंच प्रवीण काटकर, विजय तळवेकर, दीपक तपासे, माजी सरपंच गणेश वादाडे, अतुल तिमांडे, भास्कर वरभे, पंचायत समिती सदस्य प्रमोद वरभे, अतुल देशमुख, प्रवीण पाल, शेखर कोल्हे, आदींचा आंदोलनात सहभाग होता.आष्टी (शहीद) : आष्टी येथे बस स्थानक परिसरात दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नगरपंचायतीचे गटनेते अशोक विजयकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आवेज खान, पं. स. सभापती रेखा मतले, पं. स. उपसभापती गोविंद खंडाळे, जि. प. सदस्य छाया घोडीले, बाजार समिती संचालक रामदास लव्हाळे, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, अमोल पवार, दीपक डाखोळे, प्रज्वल चोहटकर, नरेंद्र भनेरकर, नीरज भार्गव, रावसाहेब गोरे, प्रमोद कापसे, रामू येवले, योगेंद्र मतले, राजेंद्र चोरे, राहुल केचे, अरुण घोडीले आदी कार्यकर्ते व दूध उत्पादक उपस्थित होते.झडशी : येथे भाजयुमोने दूध आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी दूध वाटप करण्यात आले. आंदोलनात सेलू तालुका भाजयुमो महामंत्री, टाकळीचे उपसरपंच संकेत बारई, भूषण पारतकर राजू लिडबे, कैलास बारई, सुनील बारई, मुन्ना सावरकर, विनोद कुणघटकर यांच्यासह दुग्ध उत्पादकांचा सहभाग होता.रोहणा : येथे भाजप कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात सामान्यांना मोफत दुधाचे पाकीट वितरीत करून सरकारचा निषेध केला. आंदोलनात भाजप सर्कलप्रमुख राजेश हिवसे, राजेंद्र कोहळे, फुलचंद गळहाट, ज्ञानेश्वर घोडे, प्रभाकर बोबडे, प्रकाश टाकळे, प्रकाश घोटकर, वैभव जगताप, सुनील बोंदरे, यादवराव सुपनर, शाबीर शेख, पुरुषोत्तम डायरे, बंडू जगताप, शकील शेख, दिनेश आंबटकर, प्रीतम कदम, धीरज बोबडे, राजू गाडेकर, सुधीर रणनवरे, धम्मा लोहकरे, सुरेश मिटकरी, चंदू गुलवार, सूरज देवरे, हेमंत वडतकर, प्रतीक आसटकर, अमित बोंदरे, नीलेश पोकळे, यश हिवसे आदींचा सहभाग होता.आर्वी : येथे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरी व ग्रामीण भागात नागरिकांना दुधाचे वाटप करून आंदोलने केली. उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण कार्यकर्त्यांचा सहभाग होता. फोटो आहे. वाढोणा येथे बसस्थानक चौकात दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सत्तार खान, जगजीवन भांगे, अतुल खोडे, आर्वी भाजयुमो अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, सतीश कामडी, आदींचा सहभाग होता.हिंगणघाट : येथे आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तहसीलदार श्रीराम मुंदडा यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री किशोर दिघे, जि. प. चे माजी अध्यक्ष नितीन मडावी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि. प. सभापती माधव चंदनखेडे, माजी सभापती वसंत आंबटकर, पं. सं. सभापती शारदा आंबटकर, गंगाधर कोल्हे, जि. प. सदस्य शरद शहारे, आकाश पोहाणे, उमेश तुळसकर, आशिष परबत, बिस्मिल्ला खान, सोनू गवळी, अंकुश ठाकूर, किरण वैद्य, विठू बेनिवार, सुभाष कुंतेवार, रमेश टपाले, छाया सातपुते, रवीला लाखाडे, वैशाली पालांडे, नीता धोबे, पद्मा कोडापे, सारिका उभाटे, ज्योत्स्ना सरोदे, विनोद विराळे, तुषार आंबटकर आदींचा सहभाग होता.आंजी (मोठी) : येथे दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेच्या समोरील चौकात दूध बंद, दूध वाटून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गफाट, सरचिटणीस अविनाश देव, कमल कुलधरिया, नीलेश पोहेकर, जि. प. सदस्य जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरिया, दिनेश उमक, उपसरपंच दिलीप रघाटाटे, नरेश पचारे, मोहन पराते, मनोहर मंगरुळकर, संतोष बालपांडे, विजय गोमासे, संजय जाधव, यांचा आंदोलनात सहभाग होता.समुद्रपूर : येथे नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष वर्षा बाभूळकर, संजय डेहणे, किशोर नेवल, जामचे सरपंच सचिन गावंडे, श्रीकांत महाबुद्धे, समीक्षा मांडवकर, शीला सोनारे,, सुनील डुकरे, नरेंद्र पोफळे, गोपाल कच्छवा, कैलास टिपले, अंकुश खुरपुडे आदींनी दूधप्रश्नी आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन दिले.पुलगाव : येथे भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते, शहर अध्यक्ष नितीन बडगे, आकाश दुबे, राजकुमार पनपालिया, मानसिंह झांझोटे, गजेंद्र गारपिल्लेवार, नगरसेविका माधुरी इंगळे, संतोष तिवारी, भारत नागपाल, शकील खान, सुरेश सुखीजा, मधुकर रेवतकर, प्रितम अरोरा, विशाल धोपाडे आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

टॅग्स :milkदूधBJPभाजपा