शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:27 IST

काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा काँग्रेसकडून ही लाट असल्याची भावना व्यक्त होत होती. त्यानंतर विधानसभेत दणदणीत यश मिळवून भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हाही काँग्रेसकडून लाट ओसरली नसल्याचे बोलल्या जात होते. परंतु दरम्यानच्या बहुतांश निवडणुकीत भाजपाने निर्विवाद सत्ता काबीज केली. त्यामुळे सध्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची स्थिती २०१४ च्या स्थितीपेक्षाही भक्कम आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.आगामी निवडणुकींच्या तयारीकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी वर्ध्यात आले होते. त्यांनी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहेत. जवळपास ५ हजार सरपंच आहेत, ८१ नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. १५ महानगर पालिका तर १२ जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहेत. एखादी पोटनिवडणूक सोडली तर बाकींवर भाजपानेच मोहोर उमटविली आहे. आम्ही अजेंड्याच्या बाहेर जावूनही अनेक विकासात्मक कामे केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोष यश मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, आ. रामदास आंबटकर, आमदार अरुण अडसड, आ समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने दादाराव केचे यांची उपस्थिती होती.एक बुथ, २५ युथ ही संकल्पनापक्ष बांधणीकरिता राज्यातील २८८ मतदार संघामध्ये २८८ पुर्णवेळ विस्तारक नेमले आहे.कार्यकर्त्यांना एकत्र करुन बुथची बांधणी करण्यात आली आहे. राज्यात ९२ हजार ४०० बुथची बांधणी करण्यात आली आहे. ८८ हजार बुथ प्रमुखांची नेमणूक करुन त्या बुथ प्रमुखाने पन्ना प्रमुख नेमले आहेत. एका बुथवर जवळपास १६ ते १७ पान असून एका पन्ना प्रमुखाला एक पान दिले जाणार आहेत. त्यावर ६० जणांची नावे असून त्या पन्ना प्रमुखाला निवडणूकीपर्यंत या सर्वांना भेटी द्यायच्या आहे.‘एक बुथ, २५ युथ’ ही संकल्पना राबवून निवडणूकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभानिहाय दौरा करणारआगामी निवडणूकींचा विचार करुनच राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासोबत जालना, संभाजीनगर व मावळचा दौरा केल्यानंतर शनिवारला गडचिरोली व चंद्रपूर तर रविवारी वर्धा व यवतमाळ आणि सोमवारी अमरावती व रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचीही तयार करुन घेणार असल्याचे सांगितले.वेगळ्या विदर्भाबाबत अस्पष्ट भूमिकासत्तेत येताच विदर्भ वेगळा देण्याची घोषणा भाजपाने केली होती. आता सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरीही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न प्रलंबीतच असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत दानवे यांना पक्षाची भूमिका विचारली असता त्यांनी अटलबिहारींच्या काळात छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड हे राज्य वेगळे केले तेव्हा नागरिकांनी पेढे वाटले. पण, काँग्रेसने तेलंगणा राज्य वेगळे केले तर गोळ्या खाव्या लागल्या.त्यामुळे राज्याच्या विभाजनाकरिता सर्वांचं एकमत आवश्यक आहे, असे सांगितल्याने वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येते. भाजप नेहमीच छोट्या राज्याच्या समर्थनात राहिलेला आहे असेही ते म्हणाले.