नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समिती दिंड्या काढणारपुलगाव : आमचा पक्ष लहान-लहान राज्याच्या निर्मितीचा समर्थक आहे, अशा शब्दात भाजप नेत्यांनी विदर्भ राज्याबाबत आपली भूमिका मांडून मते मिळविली होती. सत्ता आल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये विदर्भ राज्याबाबत कुठेही एकवाच्यता नाही. स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपा शासनाने आपले आश्वासन पाळावे. याकरिता विदर्भातील पाच ठिकाणाहून दिंड्या काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक प्रा. राम नेवले यांनी दिली.यावेळी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. या नेत्यांना आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी गाडगेबाबांच्या शेडगाव येथून विदर्भ दिंडी यात्रा काढून जनजागृती केली जाईल. या पाचही दिंड्या ५ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात धडकणार, असे नेवले यांनी सांगितले. याप्रसंगी मधु हरणे, महेश वल्लमवार, सतीश दरणी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपा शासनाने आश्वासन पाळावे
By admin | Updated: November 16, 2016 00:54 IST