शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

तळेगाव येथील ग्रा.पं.कडून आरओ वॉटर प्लांटकरिता उड्डाणपूल चौकातील जागा निवडण्यात आली. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसतानाही या जागेवर आरओ प्लांट उभारल्यास अपघाताचा धोका संभावतो, तसेच तेथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.  त्यामुळे व्यावसायिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्यात आहेत. या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मोक्यावर जाऊन जागेची मोजणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले आहेत. अशातच आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे ग्रा.पं.च्या आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. बुधवारी झालेल्या या हाणामारीचा गुरुवारी सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.तळेगाव येथील ग्रा.पं.कडून आरओ वॉटर प्लांटकरिता उड्डाणपूल चौकातील जागा निवडण्यात आली. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसतानाही या जागेवर आरओ प्लांट उभारल्यास अपघाताचा धोका संभावतो, तसेच तेथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.  त्यामुळे व्यावसायिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्यात आहेत. या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मोक्यावर जाऊन जागेची मोजणी केली. ही मोजणी सुरू असतानाच व्यावसायिक तथा काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद चोहतकर आणि भाजपाचे जिल्हा सचिव सचिन होले यांच्यामध्ये वादावादी होऊन हातापाई सुरू झाली. त्याचे चित्रीकरण झाल्याने सध्या तळेगावात राजकीय वातावरण तापलेले आहे. यासंदर्भात तळेगावचे पोलीस निरीक्षक गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले. आज सचिन होले यांनी या घटनेच्या निषेधार्थ सभा घेऊन काँग्रेसकडून सातत्याने विकासकामांना विरोध होत असल्याचा आरोप केला.

आरओ प्लांटला आमचा विरोध नाही; परंतु जी जागा निवडली ती चुकीची असल्याने आम्ही सर्व ९१ व्यावसायिकांनी स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तक्रार केली. त्यानुसार काल महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी जागा मोजण्याकरिता आले होते. मोजमाप सुरू असताना होले तेथे आले आणि त्यांनी आरओ प्लांट माझ्या दुकानासमोर लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी नसताना ही लुडबुड कशाला, असा जाब विचारला असता अंगावर धावून मारहाण केली. मी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. -प्रमोद चोहतकर, व्यावसायिक तथा काँग्रेस कार्यकर्ता

उड्डाणपुलाच्या चौकामध्ये नेहमी वर्दळ राहत असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्यांना अत्यल्पदरात शुद्ध पाणी मिळावे याकरिता दर्शनी भागातील जागा निवडली. याला सुरुवातीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. अखेर जागेची मोजणी केली असता आरओ प्लांटकरिता निवडलेली जागा महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीबाहेर दिसून आली. त्यामुळे विनाकारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. -सचिन होले, जिल्हा सचिव, भाजपा 

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस