शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:13 IST

राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

ठळक मुद्देतानसेन नंनावरे : पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. भाजप सरकारने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आंबेडकरी जनता धडा शिकवेल, असे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नंनावरे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.तानसेन नंनावरे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता दिली. भाजपाचा संविधान बदलविण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. हिंदू राष्ट्राला आमचा विरोध नाही; पण ते मनोस्मृतीवर आधारीत नसावे. भाजपा सरकार प्रत्येक जात एक दुसऱ्याच्या विरोधात उभी करीत आहे. २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास संविधान बदलविले जाईल. संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठीशी घालत आहे. ना. रामदास आठवले त्यांच्याकडून आंबेडकरी जनतेचे प्रश्न दिल्ली दरबारी न मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची दिशाभूलच करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.पुढील २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून त्यावेळी आम्ही वास्तविक परिस्थिती जनतेसमोर ठेवून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करू. नुकतीच आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय पुढाºयांचीही भेट आम्ही घेणार आहो. वर्धा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नव्या जोमाने काम करावे, असेही आवाहन यावेळी तानसेन नंनावरे यांनी केले. पत्रकार परिषदेला नितीन मोरे, आनंद निरभोवणे, अशोक खरात आदींची उपस्थिती होती.संभाजी भिडे यांना राज्यसरकार पाठीशी घालतेयराज्यात काही व्यक्ती राष्ट्रच्या एकात्मतेला धोका पोहोचेल असे कारस्थान करीत आहेत. त्यांना आळा घालण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असून संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठिशीतच घालत असल्याचा आरोप याप्रसंगी तानसेन नंनावरे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा