शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:12 IST

जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधान्य घ्यायला तुफान गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे.  दादाराव केचे यांच्याविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यातआपत्ती व्यवस्थापन   कायदा 2005  52/53 अन्वये कलम १८८,269,270  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्ताने गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचे आमदार केचे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी शनिवारी वॉडावॉर्डांत सायकल रिक्षाद्वारे दवंडी देण्यात आली होती. ही माहिती असल्याने केचे यांच्या निवासस्थानापुढे रविवारी सकाळपासूनच रांगा लागणे सुरू झाले. गहू, तांदूळ व अन्य किराणा स्वरूपात पिशव्या तयार होत्या. मात्र, गोरगरिबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सुज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप तत्काळ बंद करण्यात आले. केचे यांचे निवासस्थान ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. दरम्यान, काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र ही घटना जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात आमदार केचे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस साजरा झाला. मात्र, त्यांनी खबरदारी घेत गरजूंना घरोघरी जात धान्यवाटप केले होते. खासदारांचे उदाहरण आमदारांनी डोळ्यापुढे ठेवले असते तर हा प्रकार घडला नसता, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी प्रशासनाकडून घेण्यात आली नव्हती. या संदर्भात चौकशी अहवाल तयार करून पुढील कारवाईचा विचार केला जाईल.-हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी, आर्वी

टॅग्स :Dadarao Kecheदादाराव केचेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस