शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अभियानातून जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:29 IST

संत गाडगेबाबा यांच्यासह महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वत: हातात झाडू घेतला होता. त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

ठळक मुद्देवर्धा, देवळी, आर्वीत राबविला विशेष उपक्रम : नागरिक व लोकप्रतिनिधीच्या सहभागात फिरला झाडू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संत गाडगेबाबा यांच्यासह महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वत: हातात झाडू घेतला होता. त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभºयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी वर्धा शहरासह आर्वी, देवळी आदी ठिकाणी विशेष उपक्रम हाती घेऊन विविध शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या उपक्रमात लोकप्रतिनिधींसह शासकीय कर्मचारी व तरुण-तरुणी सहभागी झाले होते. सदर विशेष उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांसह शासकीय कर्मचाºयांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण कार्यालय व परिसर स्वच्छ केला. यावेळी गोळा झालेल्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून घाणीच्या विळख्यात असलेले अनेक कार्यालये स्वच्छ झालीत. यावेळी शासकीय कर्मचाºयांनी कार्यालय परिसरातील गवतही स्वच्छ केले. एकूणच या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागरच संपूर्ण जिल्ह्याभर करण्यात आला,वर्धा नगर पालिकेत घेतली सामूहिक शपथवर्धा : स्वच्छता हीच सेवा ही मोहीम न.प. मध्ये राबविण्यात आली. यावेळी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, बांधकाम सभापती निलेश किटे, आरोग्य सभापती मिना भाटीया, शिक्षण सभापती श्रेया देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डिंकेश ढोले, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्यासह सर्व न.प. पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी १०० तास म्हणजे, प्रत्येक आठवड्यात दोन तास श्रमदान करुन मी स्वच्छतेच्या संकल्पाचा अंगीकार करेल. मी अस्वच्छता पसरवणार नाही तसेच ती कुणालाही करू देणार नाही, अशी शपथ यावेळी न.प. कर्मचाºयांसह पदाधिकाºयांनी घेतली. कार्यक्रमाला वर्धा नगर पालिकेतील सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आर्वीच्या विविध भागात स्वच्छतालोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारतची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारणीचे आवाहन केले आहे. त्याला केंद्रस्थानी ठेऊन शुक्रवारी ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम शहरात राबविण्यात आली.उपक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी या विशेष उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून स्वच्छतेची व्यापक लोक चळवळ उभी करुन आर्वीचे नाव लौकीक करा, असे आवाहन केले.नगर परिषद आर्वी परीसरात शुक्रवारी सकाळपासून राबविण्यात आलेला हा उपक्रम दुपारी तीन वाजतापर्यंत राबविण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, गट नेते प्रशांत ठाकूर, आरोग्य सभापती रामू राठी, नियोजन सभापती जगणराव गाठे, बांधकाम सभापती हर्षल पांडे, नगरसेवक अजय कटकमवार, सुनील बाजपेयी, कैलास गळहाट, संजय थोरात, राहुल गोडबोले, उषा सोनटक्के, भारती देशमुख, हेमंत काळे, अब्बूभाई, राजू डोंगरे, विजय गिरी, भाजपा शहर अध्यक्ष विनय डोळे, पप्पू जोशी, प्रफुल्ल काळे आदींनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. यावेळी आठवडी बाजार, इंदिरा चौक, भाजी बाजार, नेहरु मार्केट, बांगडी लाईन, मेन रोड, गांधी चौक, शिवाजी चौक, सुभाष मार्केट आदी परीसरात स्वच्छ करण्यात आला.अभियान झाले लोक चळवळरामदास तडस : देवळी पालिकेतील कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छता अभियान ही एक चळवळ झाली आहे. गाव स्वच्छतेचा संदेश या माघ्यमातून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १५ सप्टेंबर ते २ आक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभºयात सदर अभियान राबविले जात आहे. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून श्रमदान करावयाचे आहे. महात्मा गांधी यांचे जन्मदिवशी अभियानाची शपथ घेवून सेवा दिवस म्हणून काम करावयाचे आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.स्थानिक नगर पालिका सभागृहात आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करताना ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, न.प. सभापती कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, न.प. सदस्य मिलिंद ठाकरे, मारोत मरघाडे, संगीता तराळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन न.प. पाणी पुरवठा अभियंता चारुबाला हरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार किशोर चिंचपाले यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन सायंकार, सुनील पुरी, राजू भोयर, सुनील ताकसांडे, प्रशांत धोबे, अशोक क्षीरसागर, सुनील खोंड, उत्तम कामडी, देवेंद्र येनुरकर, महादेव सुरकार, अशोक झाडे, राजु करंदीकर, यांच्यासह देवळी नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.