महामार्गावरील घटना : दुचाकीस्वार गंभीर जखमीतळेगाव (श्यामजीपंत ): येथील नागपूर- अमरावती मार्गावरील शांताई सभागृहजवळ उभ्या असलेल्या कारवर मागून आलेले भरधाव दुचाकी आदळली. यात दुचाकी चालक कारच्या मागचा काच फोडून आत घुसल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. सविस्तर वृत्त असे की, अमरावती मार्गावरील शांताई सभागृहाजवळ एमएच ३१ सी.एम. ३२४६ कार रस्त्याच्या कडेला उभी होती. मागावरून एमएच ३१ ए.वाय.३०५९ हा दुचाकीचालक अक्षय श्रीकृष्ण आमझरे (२१) रा. बेलोरा याने भरधाव उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली. तो सरळ कारच्या मागचा काच फोडून आत शिरला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतच तेथून त्याने गावकडे पळ काढला. काही युवकांनी त्याला त्याच्या गावातून पकडून आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याची अवस्था पाहून त्याला उपचारासाठी प्रथम आर्वी व नंतर वर्धेला हलविले. पुढील तपास जमादार नंदनवार, सुनील मेंढे करीत आहेत.(वार्ताहर)
उभ्या कारवर दुचाकी आदळली
By admin | Updated: October 4, 2015 02:55 IST