लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मनसावळी येथील ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या रक्षणासह बॅकांनाही शेतकरी आरक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. शेतकरी आरक्षणावर ग्राम पंचायत सदस्य गणेश बाराहाते यांनी प्रास्ताविकात माहिती दिली व सभेत हा प्रस्ताव मांडला. सरपंच महेश इंगोले यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांना दारिद्रयातून कायमच्या सुट्टीचा पर्याय म्हणून हा प्रस्ताव उदयास आला आहे. शेतकऱ्यांसाठी आरक्षणाची शैलेश अग्रवाल यांची ही मागणी देशव्यापी आहे व आजवर वीस लाखांहून अधिक सुशिक्षित समर्थक असून आमच्यासारखे असंख्य नोंद नसलेले खेड्यातील शेतकरी समर्थक आहेत. देशातील कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी हा आविष्कार वर्धा जिल्ह्यातून उदयास आल्याचा गर्व येथील शेतकऱ्यांना आहे. फक्त शेतकºयांंच्याच विकासाचा नव्हे तर संपूर्ण ग्रामविकासाचा हा प्रस्ताव आहे. देशाच्या प्रगतीसाठी व शेतकºयांच्या उन्नतीसाठी हा प्रस्ताव सर्वोत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.शैलेश अग्रवाल यांनी प्रस्तावातील शेतकरी, शेतमजुर, प्रकल्पग्रस्त, विद्यार्थी, गृह उद्योग, शेतीपूरक व्यवसायी व दुग्ध उत्पादकांसाठी विविध उपाय योजना यावेळी सांगितल्या. या सभेत अरुण भगत, दिवाकर खडसे, महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांनी आपले मत मांडले. ग्रामस्थांच्या एकमताने शेतकरी आरक्षणाच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच महेश इंगोले यांच्या परवानगीने केंद्र व राज्य शासनाने अंमलबजावणी करावी यासाठी ठरावाच्या प्रती पाठविण्यात आल्या. अशी माहिती ग्राम पंचायत मनसावळी यांनी दिली आहे. कानगावचे जिल्हा परिषद सदस्य भारत चौधरी यांच्या सहकायार्तून या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे सरपंच महेश इंगोले यांनी सांगितले.कापशीत आरक्षणासाठी बैठकहिंगणघाट- तालुक्यातील ग्राम पंचायत कापसी येथील नानाजी महाराज देवस्थानात सरपंच अरुण शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आरक्षण विषयावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते . त्यांनी शेतकऱ्यांच्या आशवस्त रक्षणासाठी दीर्घकालीन विकासात्मक उपाय योजना सुचविणारा हा शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव आहे. ज्यांना जातीचे आरक्षण असेल त्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, शेतीपूरक व्यवसायिकांना, प्रकल्पग्रस्तांना, दुग्ध उत्पादकांना, विद्यार्थ्यांना व ग्रामीण जीवन प्रणालीत जीवन अर्पण करणाऱ्या ग्रामस्थांना या शेतकरी आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. देशातील ७० टक्के ग्रामीण जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनारूपी लाभ पोहचवणे अशक्य असल्यामुळे, वेळ व मनुष्यबळ वाचवून अचूक उपायांद्वारे आपल्या देशातील प्रधान व्यवसायाला वृद्धीगत करण्यासाठी धोरण रूपाने शेतकरी आरक्षण संकल्पना सुचविण्यात आली आहे. असे ते म्हणाले. या ग्रामसभेत उपसरपंच देवीदास सावरकर, ग्रा.पं. सदस्य सुरेश वनकर, कुसुम काळे, सुवर्णा निमसडकर, छाया वासेकर, दिव्यानी साटोणे यांनी विचार व्यक्त केले. आशिष शेंडे, बेबी लोणारे, मालु बावणे व इतरांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व ग्रामस्थांनी एकमताने या प्रस्तावावर ठराव पारित केला. जोपर्यंत शेतकरी आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत हा लढा लढण्याचा निर्धार नानाजी महाराजांच्या साक्षीने उपस्थितांनी केला व शेतकऱ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
शेतकऱ्यांच्या रक्षणासह बँकांनाही शेतकरी आरक्षणाचे फायदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:00 IST
मनसावळी येथील ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या रक्षणासह बॅकांनाही शेतकरी आरक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या रक्षणासह बँकांनाही शेतकरी आरक्षणाचे फायदे
ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : मनसावळी येथील ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित