शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची पाण्यामुळे वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:25 IST

धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.दिघी (बोपापूर) रसत्यावरील यशोदा नदी व बाजूचा नाला जलमय झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. नदीचा व नाल्याचे पाणी एक झाल्याने शाळेकरी मुले आणि नागरिक पुरात अडकले होते. तसेच सोनेगाव (बाई) मार्गावरील नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद झाली होती. चार पदरी रस्ता व पुलाचे बांधकाम उंच असल्याने शिरपूर गावात पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नसल्याने अनेकांच्या घरात दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजल्याने संध्याकाळच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला.अनेकांचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यांनी प्लास्टीकचा कागद आंथरुन संसार थाटला होता. काहींनी आजुबाजुच्या घरांचा आसरा घेवून तर काही किरायाचे घरात दिवस काढत आहे.या योजनेअंतर्गत देवळीत आठशे घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. परंतु बºयाच लाभार्थ्यांना निधीचे हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. अशा लाभार्थ्यांची या पावसामुळे चांगलीच वाताहत झाली.पुलगाव ते कळंब मार्ग बंदनाचणगाव- दोन दिवसापासून संततधार पावसाने परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुलगाव ते कळंब मार्गावरील सोनोरा फाटा येथील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पावसामुळे सर्वत्र नाले धो-धो वाहायला सुरुवात झाली. सध्या शेतातील कामांनाही ब्रेक लागला असल्याने शेतमजूर घरीच आहे. परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक बाहेरगावावरुन ये-जा करतात. आज संततधार पाऊस असल्याने पुरामुळे अनेक शिक्षक शाळेत पोहोचलेच नाही. त्यांना नाल्याचा पूर पाहूनच परत जावे लागले.

टॅग्स :Rainपाऊस