शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीचे तोकडे अनुदान तरीही लाभार्थ्यांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा कर्ज काढून काम पूर्ण करून घेतात. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही अनुदानाच्या रकमेकरिता त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. 

फनिंद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाच्या कांदा चाळ योजनेतून बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीचे बांधकाम केले. यासाठी साधारणत: दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. पण, त्याकरिता मिळणारे अनुदान केवळ ८७ हजार ५०० रुपये आहे. परंतु, आता वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा कर्ज काढून काम पूर्ण करून घेतात. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही अनुदानाच्या रकमेकरिता त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशीच स्थिती सध्या कांदा चाळीच्या लाभार्थ्यांची झाली आहे. आर्वी तालुक्यामध्ये १००पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कांदा चाळ बांधली. आता बांधकाम पूर्ण होऊन सहा ते सात महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अनुदान मिळालेले नाही. कृषी विभागाकडून मार्च अखेरपर्यंत अनुदान मिळेल, असे आश्वासन मिळाले होते. आता मे महिना सुरू झाला तरी अनुदानाचा पत्ता नाही. कृषी विभाग केवळ योजना थोपविण्याचे काम करून कागद काळे करतो. पण, शेतकरी मात्र अनुदानाअभावी कंगाल होत असल्याची जाणीव त्यांना नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे तातडीने अनुदान बँक खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे. आता शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

महागाईमुळे बांधकाम खर्चही वाढला-    राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून विदर्भात कांदा चाळ योजना मोठ्या प्रमाणात राबवली. या योजनेतून १५ बाय ४० चौरस फूट कांदा चाळ बांधण्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च येईल. त्यापैकी ८७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले होते. पण, वाढत्या महागाईमुळे स्टील, सिमेंट, वाळू, गिट्टी व मजुरी वाढल्याने बांधकाम खर्च दोन लाखाच्यावर गेला. इतकेच नाही तर बांधकाम पूर्ण झाल्यावरही अनुदान मिळाले नाही.

खरिपाच्या तयारीत येताहेत अडथळे-    शेतकऱ्यांनी अनुदान मिळेल म्हणून खरिपाच्या बी-बियाणे व खतासाठी हाताशी ठेवलेले पैसे कांदा चाळीच्या बांधकामासाठी वापरले. त्यामुळे लाभार्थी आता अनुदानाची वाट बघत आहे. शासनाकडून अनुदान मिळाले नाही तर खरिपाचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने अनुदान वितरित करून शेतकऱ्यांची विवंचनेतून मुक्तता करण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी