शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
3
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
4
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
5
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
6
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
7
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
8
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
9
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
10
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
11
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
12
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
13
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
14
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
15
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
16
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
17
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
18
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
19
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
20
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल

By महेश सायखेडे | Updated: October 7, 2023 16:46 IST

२६९ रुग्णांवर होताहेत उपचार

वर्धा : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा १५ ऑगस्टपासून मोफत करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत तिप्पटीनेच वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील सोई-सुविधांचा शनिवारी रिॲलटी चेक केला असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी तब्बल ९३.०७ टक्के इतकी असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल २६९ विविध आजारांच्या रुग्णांना उपचार दिले जात होते. विशेष म्हणजे मागील २४ तासांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५७ रुग्णांना दाखल करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरी जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला उत्तम शासकीय आरोग्य सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न कार्यरत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

दहा रुग्णांना केले रेफर आऊटमागील २४ तासांत जिल्हा रुग्णालयात ५७ नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. यात पाच रेफरीन रुग्णांचा समावेश आहे. मागील २४ तासांचा विचार केल्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तब्बल दहा रुग्णांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे) तसेच नागपूर येथील रुग्णालयात रेफर आऊट करण्यात आले आहे.आयसीयूत सात तर चाईल्ड वॉर्डात तेरा रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. चाईल्ड वॉर्डात सध्या तेरा रुग्ण दाखल असून मागील २४ तासांत एका छोट्या मुलाला पुढील उपचारासाठी रेफर आऊट करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात सुसज्य असा अतिदक्षता विभाग आहे. या विभागात सध्या सात रुग्ण असून त्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

एसएनसीयूमध्ये अठरा नवजात बालकांवर होताहेत उपचार

नवजात बालकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्य असा एसएनसीयू कक्ष तयार करण्यात आला आहे. या विभागात सध्या १८ नवजात बालके दाखल असून गत चोवीस तासांत सेलू येथून रेफर आऊट केलेल्या एका नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये दाखल करून घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.एकाचा झाला मृत्यू

पुलगाव नजीकच्या विरुळ येथून पुढील उपचारासाठी रेफर आऊट केल्यानंतर एका ५४ वर्षीय पुरुषाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दारूपिण्याच्या सवईचा आणि जंतू संसर्ग झालेल्या या रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबतची नोंद रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल