शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हस्ताक्षरांतील सुंदरता होतेय लुप्त

By admin | Updated: January 29, 2015 23:13 IST

तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून

तुळजापूर (व़) : तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़ कला शिक्षकांनी हस्ताक्षराचे अधिक तास घेऊन शाळेत सुंदर अक्षर हा दागिना म्हणून जतन करणे गरजेचे झाले आहे़ अति प्राचीन काळापासून म्हणजे अगदी संत-महंतांच्या काळापासून काही काव्य, भारूड, ऐतिहासिक पत्रे लोकगीते आदी वाड़मय प्रकार स्वरूपाचे हस्तलिखाण केले जात होते़ एखाद्या व्यक्तीकरवी सुंदर हस्ताक्षर लिहून जतन करून ठेवले जात होते़ यासाठी शाई आणि बोरूचा वापर केला जात होता़ आताच्या बॉलपेनच्या युगात मुलांना शाईपेनचा विसर पडत चालला आहे. सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा अनमोल ठेवा आहे. अक्षरं सुंदर असल्यास शिक्षकच नव्हे तर मित्र, मैत्रिण, नातेवाईक, उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक त्याच्या अक्षरावर प्रसंगी त्याच्या विद्वत्तेवर प्रेम करतात़ एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कसे सुधारेल, त्याचा हा दागिना कसा टिकून राहील, यासाठी कलाशिक्षक त्यांना चांगलेच राबवून घेताना दिसत होते; पण ते आज दिसत नसून कालबाह्य होऊ पाहत आहे़ या धकाधकीच्या जीवनचक्रात सुंदर हस्ताक्षर जिवंत राहावे म्हणून शहराच्या मध्यभागी हस्ताक्षरे सुधारवर्ग घेतले जातात़ यात विद्यार्थ्यांकडून वारेमाप शुल्क घेऊन बालक-पालकांची गोची केली जाते; पण यातून ते इच्छा पूर्ण करीत आहे. आधुनिक लिखाणाच्या साधनांमुळे सर्व स्वलेखन विसरून भोगवादाकडे वळले आहेत़ हा चिंतेचा विषय आहे़ विज्ञान युगात वेगवेगळे आधुनिक शोध लागतात़ इंटरनेट, लॅपटॉप, संगणक, टायपिंग, टचस्क्रीन लॅपटॉप यासह अन्य साधनांचा वापर विद्यार्थ्यांपासून तर अधिकारी वर्गापर्यंत होताना दिसतो़ यामुळे स्वत: लिखाण करण्याचा सराव खुंटला आहे़ साधा अर्ज लिहायचा झाल्यास आधुनिक साधनांचा वापर करून पैसे मोजून वेळ मारून नेली जाते़ यात ग्रामीण बालक-पालकांची गोची होते़ या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कला शिक्षक व शाळांनीही या विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)