शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सावधान..! आता महिलाही ‘सेक्सटॉर्शन’च्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:04 IST

सध्या नागरिकांना गंडा घालण्यासाठी सेक्सटॉर्शन हा नवीन फंडा भामट्यांनी सुरू केला आहे. आता तर चक्क महिलांच्या फेसबुक मेसेंजरवर त्याच महिलेचे फोटो मोर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देपुरुषांनंतर आता महिलांचीही फसवणूकअनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे पोलिसांचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्क  वर्धा : सध्या नागरिकांना गंडा घालण्यासाठी सेक्सटॉर्शन हा नवीन फंडा भामट्यांनी सुरू केला आहे. आतापर्यंत पुरुषांच्या अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या असून, आता तर चक्क महिलांच्या फेसबुक मेसेंजरवर त्याच महिलेचे फोटो मोर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनो, आता अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.

फेसबुकवरून सुंदर मुली चॅटिंग करून त्यानंतर थेट व्हॅट्सऍपद्वारा नग्न व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग करतात. ती रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करीत पैसे उकळतात. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सायबर भामट्यांकडून सुरू आहे. पुरुषांना गंडविल्याच्या अशा अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, आता चक्क महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यांचे फोटो माॅर्फ करून ते अश्लील छायाचित्र महिलेच्या मेसेंजरवर टाकून पैसे उकळण्याचा धंदा सुरू झाला आहे. त्यामुळे पुरुषच नव्हेतर, आता महिलांनीदेखील सावध राहण्याचे आवाहन वर्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले घटस्फोट अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. मात्र, आता महिलाही यात गुरफटल्या जात असून, त्यांनादेखील ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. शहरातील दोन ते तीन महिलांसोबत असा प्रकार घडला असून, त्यांनी थेट सायबर पोलीस ठाणे गाठून याबाबतची माहिती सायबर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे महिलांनी आता सावध राहण्याची गरज आहे.

कस्टमर केअर क्रमांक शोधणे पडू शकते महागात

काही कारणास्तव कस्टमर केअरशी संपर्क करण्याचे काम पडल्यास गूगलवर हा क्रमांक सर्च करण्याची सवय असते. मात्र, ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण हॅकर्स आणि सायबर भामट्यांनी गूगलवर अनेक बनावट हेल्पलाइन क्रमांक अपलोड करून ठेवले आहेत. या क्रमांकांवर कॉल केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

 

पोलिसांकडून करण्यात आले आवाहन

फेसबूक, व्हॉट्सऍप व इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून मुलींचा फोटो वापरून बनावट अकाउंटवरून आपल्या सोबत मैत्री करून व्हॉट्सऍपद्वारा किंवा फेसबुक मेसेंजरद्वारा व्हिडिओ कॉल करून अश्लील प्रकारचे कृत्य करण्यास भाग पाडून आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो व तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. असे अनेक प्रकार पुरुषांसोबत घडले असून, आता महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांनादेखील पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच मेसेज, ईमेल आदींवर प्राप्त होणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका, स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नका, असे आवाहन वर्धा पोलीस तसेच सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

......................

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम