शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

सावधान! वर्धा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक सुपर स्प्रेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

रविवार २१ फेब्रुवारीला जिल्ह्यात दीड शतक पार करीत तब्बल २५३ व्यक्तींना आपल्या कवेत घेतले असून त्यापैकी ७९ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर २२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात ४५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी १६ कोविड बाधित वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर मंगळवार २३ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल १२५ नवीन कोविड बाधित सापडले.

ठळक मुद्देपाच दिवसांत आढळले तब्बल २७८ नवीन कोविड बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवार १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ४८७ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या ११ हजार ४९२ झाली आहे. असे असले तरी या ४८७ नवीन रुग्णांपैकी २७८ कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. परिणामी, वर्धा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक स्प्रेडर असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्राप्त माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात १०८ नवीन कोविड बाधित सापडले असून त्यापैकी ७२ कोविड बाधित वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. शनिवार २० फेब्रुवारीला जिल्ह्यात ५६ नवीन कोविड बाधितांची भर पडली असून त्यापैकी ४६ रुग्ण एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. रविवार २१ फेब्रुवारीला जिल्ह्यात दीड शतक पार करीत तब्बल २५३ व्यक्तींना आपल्या कवेत घेतले असून त्यापैकी ७९ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर २२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात ४५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी १६ कोविड बाधित वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर मंगळवार २३ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल १२५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी ६५ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.शहरासह १३ गावात उपाययोजनांचा अभाव जानेवारी २०२१ उजाडताच वर्धा जिल्ह्यात  कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर नागरिकही गाफिल राहिल्याने कोरोनाने हळूहळू आपले पाय पसरविले. तर सध्या कोरोना हा वर्धा जिल्ह्यात रौद्ररुप धारण करू पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास मागील काही दिवसांपासून वर्धा तालुक्यातच सर्वाधिक नवीन कोविड बाधित सापडत असल्याने वर्धा तालुक्यात कोरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे पालन करून घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

पाच दिवसांत कोविडने घेतला आठ व्यक्तींचा बळीशुक्रवार १९ ते मंगळवार २३ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात वर्धा जिल्ह्यातील आठ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २० रोजी दोन, २१ रोजी तीन तर २२ रोजी तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या