शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पाणीपुरवठा योजनेच्या लिकेजचा आधार

By admin | Updated: April 23, 2016 02:08 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे.

पाण्याचा असाही वापर : फुटलेल्या व्हॉल्व्हवरून समता नगरवासीय भागवितात तृष्णावर्धा : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. यामुळे नळयोजनेला पाणी येत नाही. पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता नागरिकांची परवड होत आहे. याच पाण्याचा थेंब अन् थेंब कामी यावा याकरिता पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या वरूड-म्हसाळा मार्गावरील समता नगर आणि गौतम नगर परिसरातील नागरिक पाणी पुरवठा योजनेच्या एयर व्हॉल्व्हच्या लिकेजमधून वाया जात असलेल्या पाण्यावर आपली गरज भागवत आहेत. या भागात नळ शासनाची नळ योजना असली तरी सध्या पाण्याच्या दूर्भिक्ष्यामुळे नळांना अपुरे पाणी येत आहे. आलेल्या पाण्यात नित्याची गरज भागत नाही. यामुळे या भागात पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. पवनार येथून सेवाग्राम परिसरात गेलेल्या नळ योजनेच्या व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज होत असल्याने नागरिक येथे पाणी भरण्याकरिता गर्दी करीत आहे. उन्हाचे चटके जाणवत असताना भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना २ वाजताच्या सुमारास या भागातील महिला पुरूष पाण्याकरिता या लिकेज व्हॉल्व्हजवळ गर्दी करीत असतात. सायंकाळच्यावेळी तर येथे चांगलीच झुंबड उडत असल्याची माहिती आहे. व्हॉल्व्ह मधील पाणी थेट आपल्या बादलीत पडावे, याकरिता त्यांनी प्लास्टिकची थैली बांधून त्यातून पाणी घेण्याची शक्कल येथे लढविली आहे. यातून पाणी घेत या भागातील नागरिक त्यांची पाण्याची गरज भागवित आहेत. या भागात नळ योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने शासनाने येथे पाणी पुरवठा करण्याकरिता उपाययोजना आखण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)