शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

श्रमजीवींना एसडीओंच्या निवासस्थानाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:04 AM

ना हक्काचे घर... ना डोक्यावर सावली... वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस उजाडताच कामाची लगबग सुरु होते; पण सध्या सूर्यनारायणही तळपत असल्यामुळे थकलेल्या श्रमजिवींनी आपला थकवा भागविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अंगणातील सावलीतच वामकुशी घेतली.

ठळक मुद्देसावलीत घेतली वामकुक्षी : तळपत्या सूर्यामुळे जीवाची काहिली

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ना हक्काचे घर... ना डोक्यावर सावली... वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस उजाडताच कामाची लगबग सुरु होते; पण सध्या सूर्यनारायणही तळपत असल्यामुळे थकलेल्या श्रमजिवींनी आपला थकवा भागविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अंगणातील सावलीतच वामकुशी घेतली. सध्या या निवासस्थानात अधिकारी राहात नसले तरी हे निवासस्थान आज श्रमजिवींकरिता आधार ठरले आहे.‘मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया’ चा गवगवा केला जात असताना आजही या देशात पोट भरण्यासाठी काही समाजांची भटकंती सुरूच आहे. मिळेल ते काम करीत, वाट्टेल तेथे आडोसा घेत; हा मिळालेला मानवाचा देह जगविण्याची धडपड सुरू आहे. वर्ध्यात सध्या रस्त्याच्या सिमेंटीकरण व रुंदीकरणाची कामे सुरु असल्याने परप्रांतीय मजूर शहरात दाखल झाले आहे. पहाटेपासूनच त्यांच्या कामाला सुरुवात होत असून रात्री उशिरापर्यंत ते तान्हुल्यांसह कामात व्यस्त असतात. शहरातील झाशी राणी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. या कामातही मजूर सकाळपासूनच राबतात दिसतात. सिमेंटीकरण व रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतची अनेक डौलदार झाडे तोडल्याने सावलीही हिरावली. आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने या मजुरांनाही थोडासा विसावा घेण्यासाठी सावलीची गरज भासू लागली.त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील झाडांचा आधार घेतला. तेथेच आपले थकले, क्षीण झालेले शरीर टेकवून वामकुशी घेतली. विशेषत: या शासकीय निवासस्थानी दुरुस्ती करण्यात आल्याने अद्याप कोणतेही अधिकारी येथे राहायला आले नाही. त्यामुळे या मजुरांना येथे विसावा घेण्याची सोय झाली. अन्यथा त्यांना रस्त्याच्या कडेला कुठेतरी सावलीचा आधार घेत वेळ निभावून न्यावी लागली असती. पण, या श्रमजिवींचा आजचा हा विसावा त्यांचा श्रमपरिहार करणाराच ठरला असावा.