शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:31 IST

देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.

ठळक मुद्देसेवाग्रामात तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जनसहयोग ट्रस्ट व्दारे सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना डॉ. अभय बंग बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विज्ञान हे नैतिक किंवा अनैतिक नसून ननैतिक असते. विज्ञानामध्ये नैतिकतेचा वापर गांधीजींनी केला, असे सांगून आजच्या काळात गांधी कुठे आहेत? असा प्रश्नही डॉ.बंग यांनी उपस्थित केला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.अनिल सदगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुंबईचे ९५ वर्षीय गांधीवादी डॉ. जी.जी.पारीख होते. मान्यवरांनी ‘वैज्ञानिक ता आणि गांधीजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगांवकर व प्रदीप शर्मा यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय र.र.यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातील गांधी विचारवंत तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग