शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हैदराबादसह बँगलोर येथे बँक लूटीचा डाव उधळला; विविध राज्यात घरफोडी करणारा जेरबंद

By चैतन्य जोशी | Updated: May 30, 2024 15:22 IST

वर्षभरात घरफोडी, चोरीचे ९३ गुन्हे दाखल

वर्धा : देशातील विविध राज्यांतील गावांमध्ये घरफोडी, चोरी करणारा अट्टल घरफोड्या वर्धा पोलिसांच्या गळाला लागला असून त्याने वर्ध्यात चोरी केल्यानंतर त्यांचा हैदराबाद, बँगलोर, कर्नाटक येथे असलेल्या विविध राज्यातील बँकेचे लॉकर गुगुल मॅपवर सर्च करुन बँक लूटण्याचा डाव होता. मात्र, वर्धा पोलिसांनी त्याला अटक करुन त्याचा हा चोरीचा डाव उधळून लावला. प्रशांत काशीनाथ करोशी (३८ रा. इस्कुर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या अट्टल घरफोड्याचे नाव आहे.वर्धा शहरासह लगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे सत्र सुरु होते. त्याअनुषंगाने पोलिसांची चमू चोरट्याच्या रडारवर होती. अशातच दोन दिवसांपूर्वी शहरातील नालवाडी येथील शिवार्पण नगरातील रहिवासी नंदा मारुती सरोदे यांच्या घरी चोरी झाल्याने त्याचा शोध पोलिस घेत असताना अट्टल घरफोड्या प्रशांत हा संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने चोरीची कबूली दिली. आणखी विचारपूस केली असता त्याने वर्धा हद्दीत चार घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाेखंडी टॉमी, दोन स्क्रु ड्रायव्हर, ग्लास कटर आणि रोख रकमेसह दागिने असा एकूण ७ लाख २० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल ‘रिकव्हर’ केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि वर्धा पोलिसांच्या चमूने केली...................

एक महिन्यापूर्वी केला होता ‘प्लॅन’अट्टल घरफोड्या प्रशांत करोशी याने एक महिन्यांपूर्वी बेंगलोर, कर्नाटका, चेन्नई, तामिळनाडू, हैदराबाद, तेलंगणा येथे घरफोडी करण्याचा प्लॅन तयार केला होता. लॉजमध्ये राहून तो ज्या परिसरात मोठे हायप्राेफाईल बंगले आहेत अशा सोसायटीत किरायाच्या रिक्षाने फिरुन परिसराची रेकी करायचा. वर्ध्यातून चोरी केलेली रक्कम घेऊन तो हैदराबादसह बँगलोर येथील बँक लूटणार होता.

.................देशातील विविध राज्यात वर्षभरात ९३ गुन्हे दाखल

चोरट्याने कोल्हापूर येथे ५४ घरफोडी, अहिल्यानगर येथे २ घरफोडीचा प्रयत्न, नंदूरबार जिल्ह्यातील शहदा येथे १ घरफोडी, १ प्रयत्न, दोन दुचाकी चोरी, धुळे जिल्ह्यात एक घरफोडी, ५ हजारांची रक्कम चोरी, तीन घरफोडीचे प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे दागिन्यांसह १५ हजारांची रक्कम, चाळीसगाव येथे दोन प्रयत्न, जळगाव शहरात दोन दुचाकी चोरी, अमरावती येथे तीन घरफोडू, एक दुचाकी चोरी, यवतमाळ येथील वडगाव येथे घरफोडी, पुणे शहरात पाच दुचाकी चोरी, लातुरात दोन दुचाकी, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक, कर्नाटक येथील बेळगाव येथे चार घरफोडी, इंदोर येथे १ घरफोडी, अशा ६२ घरफोडी, १५ चोरीचे प्रयत्न, १३ दुचाकी चोरी असे ९० चोरीचे तसेच एक जबरी चोरी आणि दोन फसवणुकीचे असे ९३ गुन्ह्यांची उकल केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस