आॅनलाईन लोकमतवर्धा : नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना रेल्वेतून बॅग चोरी गेल्याची तक्रार प्रभा मुलचंद गोडेफोडे (२९) रा. नाशिक यांनी वर्धेच्या लोहमार्ग पोलिसात दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासात सदर बॅग शोधून ती प्रभा गोडेफोडे यांना परत केली आहे.प्रभा या १२१०५ क्रमांकाच्या विदर्भ एक्सप्रेसने नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना १७ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल असलेली त्यांची एक बॅग प्रवासादरम्यान कुणीतरी पळविली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच बॅगचा शोध घेतला असता सदर बॅग स्थानिक रामनगर भागातील संत कवराम धर्मशाळेत आलेल्या लग्नाच्या वºहाड्यासोबत चूकून आल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सदर बॅग ताब्यात घेत सहानिशाकरीत १७ हजार ५०० रूपये मुद्देमाल असलेली बॅग प्रभा गोडेफोडे यांच्या स्वाधीन केली. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनात दिलीप बारंगे, अशोक हनवते, विजय मुंजेवार, राहुल यावले, राजु जाधव आदींनी केली.
रेल्वे प्रवासादरम्यान हरविलेली बॅग लोहमार्ग पोलिसांनी केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:14 IST