शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सेवाग्राम आश्रमातून बाबूजींना मिळाली होती वैयक्तिक सत्याग्रहाची परवानगी, राजेंद्र दर्डा यांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 12:27 IST

Sevagram Ashram: १९४१ साली अवघ्या १७-१८ वर्षाच्या वयात लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांनी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींची भेट घेऊन वैयक्तिक सत्याग्रहासाठी विशेष परवानगी घेतली होती.

 वर्धा : स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीने जोर धरला होता. ब्रिटिश हुकुमतीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तरुणाई महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात एकवटली होती. दरम्यान, १९४१ साली अवघ्या १७-१८ वर्षाच्या वयात लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांनी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींची भेट घेऊन वैयक्तिक सत्याग्रहासाठी विशेष परवानगी घेतली होती. यंदा बाबुजींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे, हे विशेष.

यानिमित्ताने लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी आपल्या मित्रांसमवेत सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी बापू कुटी, बा कुटी, आदी निवास, अखिरी निवास या प्रमुख स्थानांना नमन केले. या पावनभूमीला आपण यापूवीर्ही अनेकदा भेट दिली आहे. मात्र, बाबुजींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना सेवाग्राम आश्रमाच्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले. 

स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे बीजारोपण ज्या भूमीतून झाले ती पावनभूमी आजही सर्वांना नवी ऊर्जा प्रदान करते. आश्रमाचा हा परिसर म्हणजे एक ऐतिहासिक विचारकोष आहे, असेही ते म्हणाले. आश्रम परिसरात राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सिद्धार्थ उंबरकर यांनी सूतमालेने स्वागत केले. त्यानंतर आश्रमात सूतकताई करून त्यांनी बापूंना आदरांजली वाहिली. यावेळी सुभाष झांबड, जितेंद्र कक्कर, नगीन संघवी, पंकज फुलपगार, अनिल इरावने, अजित मुथियान, शरद परिहार, अमरावती लोकमतचे युनिट हेड सुशांत दांडगे, वृत्तसंपादक गजानन चोपडे, वर्धा हॅलो हेड अभिनय खोपडे आदी उपस्थित होते.