लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना रक्तदान करून वर्धेकरांनी आदरांजली वाहिली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय, लोकमत वृत्तपत्र समूह, युवा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी वर्धा कार्यालयाचे प्रमुख उमेश शर्मा, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, युवा सोशल फोरमचे संस्थापक सुधीर पांगुळ, रक्तपेढीचे प्रमुख प्रवीण गावंडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी. डॉ. मडावी यांनी रक्तदान शिबीर हा लोकमतचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन केले. या शिबीरासाठी डॉ. चकोर रोकडे, डॉ. देवश्री धांदे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन किशोर मानकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदानाने बाबूजींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:39 IST
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना रक्तदान करून वर्धेकरांनी आदरांजली वाहिली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय, लोकमत वृत्तपत्र समूह, युवा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
रक्तदानाने बाबूजींना आदरांजली
ठळक मुद्देपुरूषोत्तम मडावी : लोकमतचा उपक्रम स्तुत्य