शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अस्वलाच्या भीतीने पांढुर्णावासी रात्रभर जागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:30 PM

तालुक्यात ११ शेतकºयांवर हल्ले करून जंगलात दडून बसलेली अस्वल रविवारी पांढुर्णा गावजवळील शेतात पोहचली.

ठळक मुद्देवनअधिकारीही गावात : अस्वलाच्या हल्ल्यात यापूर्वी ११ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात ११ शेतकºयांवर हल्ले करून जंगलात दडून बसलेली अस्वल रविवारी पांढुर्णा गावजवळील शेतात पोहचली. अस्वलीला गावकºयांनी रिंंगण घातल्याने ती झाडावर चढली. झाडाजवळ गर्दी झाल्याने ती खाली उतरलीच नाही. यामुळे भीतीपोटी संपूर्ण गावकरी रात्रभर जागे राहिले.याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आली. त्यांनी वनरक्षकांसोबत घटनास्थळ गाठत रात्रभर गस्त दिली. अस्वल हल्ला करेल अशी भीती प्रत्येक गावकºयांच्या तोंडी होती. पहाटे पाच वाजता गावकरी घरी येताच अस्वल झाडावरून उतरून पुन्हा जंगलात गेली. अस्वलाच्या हल्ल्यांमुळे समुहाने शेतात जाण्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही. अशातच रविवारी पुन्हा हे अस्वल सुधाकर भलावी यांना दिसले. भलावी श्वापदांपासून पिकांच्या रक्षणाकरिता शेतात गेले होते. अस्वल पाहताच घाबरलेल्या अवस्थेत सुधाकर यांनी गाव गाठत माहिती दिली. लाठ्या घेवून गावकरी शेतात गेले. गावकरी येताच अस्वलीने झाडावर बस्तान मांडले. याची माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तु परतेती, उपसरपंच गजेंद्र मडावी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांना दिली. त्यांनी वनरक्षक कोरडे, ढाले, जायभाये यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले. गावकरी संतप्त झाल्याने व अस्वल हल्ला करेल या भीतीने कुणीही झोपले नाही. गत दीड महिन्यापासून अस्वल जंगलात दडून बसल्याने शेतकरी काहीसे समाधानी होते; मात्र आता पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.अस्वल गावाशेजारी शेतात आल्याची माहिती मिळताच रात्रभर गस्त केली. मारण्याची परवानगी देणे शक्यच नाही. गावकºयांना पूर्ण संरक्षण देवू अस्वल पकडण्यासाठी पिंजरे लावले आहे. मात्र ती मोठ्या हुशारीने हल्ले करते. यासाठी उपाययोजना सुरूच आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्रअधिकारी, आष्टी(श.)अस्वल शेतात येवून झाडावर चढली. आम्ही झाड तोडून अस्वलीला मारणार होतो. मात्र वनविभागाने बंदोबस्त लावल्याने मारता आले नाही. आतापरी मोई, माणिकवाडा, किन्ही, बोरखेडी मिळून ११ हल्ले झाले आहे. अस्वल सापडेपर्यंत भीती कायम आहे.- गजेंद्र मडावी, उपसरपंच